Goa Drugs Case Gomantak Digital Team
गोवा

Goa Drugs Case : मोरजी येथे अडीच लाखांचे ड्रग्स जप्त

मांद्रे येथील समीर सोपटे याला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा मोरजी येथील पार्किंग परिसरात ड्रग्सची विक्री करणाऱ्या संशयित समीर सोपटे या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 25 ग्रॅम मेथाम्फेटामाईन व 100 ग्रॅम गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली. बाजारपेठेत त्याची किंमत 2लाख 60 हजार रुपये असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांनी दिली.

मोरजी येथील पार्किंग क्षेत्रात ड्रग्सची विक्री करणारे काही तरुण संशयास्पद फिरत असतात, अशी माहिती अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शनिवार संध्याकाळपासून या कक्षाच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला होता. काही साध्या वेशातील पोलिस तेथे तैनात करण्यात आले होते.

रात्री उशिरा एक तरुण स्कुटर घेऊन आला व तो ड्रग्स खरेदी करणारे ग्राहक शोधत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्या स्कुटरच्या डिकीमध्ये शोध घेतला असता अंंमलीपदार्थ सापडले. त्याने तो ग्राहकांना विक्री करण्यास आणल्याची कबुली दिली. उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रोहन मडगावकर यांनी ही कारवाई केली. महिला उपनिरीक्षक प्रियंका गारोडी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT