Goa Drug Case | Drugs news In Goa | Drug Case in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: मागील वर्षात गोव्यात ड्रग्ज प्रकरणांत मोठी वाढ, आकडा ऐकून बसेल धक्का

Goa: क्राईम ब्रँचकडून 2.11 कोटींचा ड्रग्ज जप्त; 7 विदेशींसह 37 जणांना अटक

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case: क्राईम ब्रँचने वेळोवेळी धडक मोहिमा राबवून गेल्या वर्षी 2022 मध्ये 2021 च्या तुलनेत दुपटीने ड्रग्ज जप्‍त केला आहे. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 2.11 कोटी आहे. संपूर्ण राज्यात क्राईम ब्रँच, अमली पदार्थविरोधी पोलिस व जिल्हा पोलिसांनी मिळून सुमारे 150हून अधिक ड्रग्जची प्रकरणे नोंदविण्यात आली.

सुमारे 170च्या आसपास संशयितांना अटक झाली आहे. त्यामध्ये देशी संशयितांचे प्रमाण 80 टक्के असून त्यात गोमंतकीयांचाही समावेश आहे.

2022 मध्ये 37 जणांना अटक करण्यात आली होती त्यामध्ये 30 जण भारतीय, 4 नायजेरियन व रशियन, टांझानिया व लिबेराय या देशांचा प्रत्येकी एकजण आहे. तर 2021 मध्ये अटक केलेल्या 25 जणांमध्ये 16 भारतीय, 6 नायजेरियन व युक्रेन, गुनिया व ऑस्ट्रिया या देशांचे प्रत्येकी एकजण आहेत.

क्राईम ब्रँचने 2022 मध्ये किनारपट्टी परिसरात अधिक कारवाई केली आहे. जप्त केलेल्या 48.895 किलो ड्रग्जमध्ये बहुतेक अमली पदार्थ हा गांजा आहे. इतर ड्रग्ज महागडे असल्याने व गोव्यात आल्यावर मौजमजेसाठी देशी पर्यटक गांजाला पसंती देतात.

त्यामुळे जप्त केलेल्या गांजाचे प्रमाण 46.21किलो आहे. याशिवाय 0.136 किलो एमडीएम, 0.069 किलो एलएसडी द्रव्य, 0.00005 किलो एसएसडी पेपर्स, 0.358 किलो हेरॉईन, 01.76 किलो हशिश तेल, 0.07 चरस, 0.41 किलो मेथाम्फेटामाईन व 0.150 एक्स्टसी गोळ्या यांचा समावेश आहे.

2021 मध्ये29.340 किलो ड्रग्ज क्राईम ब्रँच विभागाने पकडला होता. त्यामध्ये गांजाचे प्रमाण 25.765 किलो होते. याशिवाय0.034 किलो एमडीएम, 0.048 किलो एलएसडी, 0.0046 किलो हेरॉईन, 0.536 किलो हशिश तेल, 3.850 किलो चरस व 0.556 किलो एक्स्टसी पावडर यांचा समावेश होता.

दोन्ही जिल्ह्यांतील पोलिसांनी सुमारे शंभरच्या आसपास ड्रग्ज प्रकरणे नोंदविली आहेत. राज्यात पोलिसांनी ड्रग्जविरोधात विशेष मोहीम सुरू केली होती. जिल्हा पोलिसांसह ड्रग्जविरोधी कक्ष व क्राईम ब्रँचने कारवाईला सुरुवात केली व प्रत्येक दिवशी एका ड्रग्ज प्रकरणाची नोंद होत होती. आतापर्यंत जी प्रकरणे नोंद झाली आहेत त्यामध्ये 90 टक्के ड्रग्ज हा गांजा व चरस सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT