Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: रेल्वेतून गांजा तस्करी? अल्पवयीन मुलाकडून 8.18 किलोचा मुद्देमाल जप्त, कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई

Konkan Railway Police: कोकण रेल्वे पोलिसांनी गुरूवारी (२० मार्च) मोठी कारवाई करत तब्बल ८.१८४ किलो गांजा जप्त केला आहे.

Sameer Amunekar

पणजी: कोकण रेल्वे पोलिसांनी गुरूवारी (२० मार्च) मोठी कारवाई करत तब्बल ८.१८४ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत ८.१८ लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर ही कारवाई करण्यात आली. मुलगा या प्लॅटफॉर्मवर उभा होता. पोलिसांनी मुलाच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून चौकशी केली असता गांजा आढळून आला. त्वरित कारवाई करत पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

चौकशीत मुलगा अल्पयवीन असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी  त्याला अपना घरात पाठवलं आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विप्लव वस्त या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. गांजा कुठून आणला तो कुठे नेला जाणार होता, याचाही शोध घेतला जात आहे.

याआधी १५ मार्चला दक्षिण गोव्यातील मडगाव शहरात जुन्या रेल्वे स्टेशनजवळील परिसरात पोलिसांना गांजा पकडण्यात यश मिळालं होतं. गोवा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ लाख ९ हजार रुपये किमतीचा १,०९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. तसेच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोकण रेल्वे पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात कठोर पावलं उचलली जात असून, रेल्वे मार्गांद्वारे नशा पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी तपासणी अधिक तीव्र करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT