Drishti  Dainik Gomantak
गोवा

दृष्टी’चे जीवरक्षक होणार अद्ययावत, नवीन तंत्रज्ञान आणि बचत तंत्रांसह मिळणार सागरी धोक्यांचे प्रशिक्षण

गोमन्तक डिजिटल टीम

Drishti Lifesaving Goa सरकारने पावसाळ्यात किनारी भागात पोहणे प्रतिबंधित केले आहे. या कालावधीत दृष्टी संस्था आपल्या 450 जीवरक्षकांना रिफ्रेशर ट्रेनिंग देणार आहे. हे प्रशिक्षण त्यांना आपत्कालीन परिस्थितीत बुडणाऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, तसेच जीवरक्षकांच्या कौशल्यातही वाढ होणार आहे.

1 सप्टेंबरपासून सुरू होणारे हे प्रशिक्षण अडीच महिने चालणार असून राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आपत्कालीन प्रतिसाद सेवांवर लक्ष केंद्रित करणारा असेल.

या प्रशिक्षणासाठी जीवरक्षकांना कठोर परिश्रम करावे लागतील. यात त्यांना 11 मिनिटात 400 मीटर पोहून आपले कौशल्य दाखवावे लागेल. या व्यतिरिक्त, प्रथमोपचार आणि सीपीआर प्रशिक्षणाला महत्त्व देण्यात येणार आहे. या पद्धती पीडितांना जलद मदत प्रदान करण्यास फायदेशीर ठरणार आहेत.

प्रथमोपचारास प्राधान्य

रिफ्रेशर प्रोग्राममध्ये सर्वसमावेशक सत्रे समाविष्ट केली आहेत. यात सीपीआर, ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटरचा वापर आणि प्राणवायू सिलिंडरची योग्य हाताळणी कशी करावी, याचे थेट प्रात्यक्षिक असणार आहे. तसेच आपत्कालीन सेवा देण्याअगोदर पीडित व्यक्तीला प्रथमोपचार देण्याचे कार्य दृष्टी करते.

सध्याच्या वेगवान जगात संस्थेला दरवर्षी कालांतराने जीवरक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागते. नवीन तंत्रज्ञान आणि बचत तंत्रांसह अद्ययावत राहणे महत्त्वाचे आहे. संस्था वर्तमानकाळात बचावकार्यामध्ये जेट स्की, बीच ऑपरेशन, फर्स्ट एड किट, बचाव उपकरणांचा आणि विविध बचाव तंत्रांचा वापर करते. - नवीन अवस्थी, सीईओ, दृष्टी मरिन.

असे असेल प्रशिक्षण

‘दृष्टी’चे प्रशिक्षक सांतान फर्नांडिस यांच्या मते, प्रशिक्षणात जीवरक्षकांची सहनशक्ती, पोहण्याची कसरत, स्ट्रोकसाठी सुधारात्मक उपाय, तीन आणि पाच मीटर उंचीवरून उडी मारणे, पाण्याखाली पोहणे आणि बोर्डसह मूलभूत कौशल्ये शिकणे, त्यासोबत या सत्रांमध्ये सर्फ जागरूकता, समुद्रकिनाऱ्यावरील परिस्थितीचा अभ्यास, भरतीची वेळ, सुरक्षा चिन्हे आणि सागरी धोके यावरील धडे समाविष्ट आहेत.

संवाद कौशल्यही महत्त्वाचे

जीवरक्षकांना विविध भाषांचे धडेही देण्यात येणार आहेत. कारण देशातील विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांसोबत संवाद साधने हे जीवरक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना समुद्र तटावरील कायदे पर्यटकांसमोर स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत, असे सांतान म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT