Morjim Parking Issue: मोरजीत पार्किंगचे तीन तेरा, चक्क ‘नो पार्किंग’ फलकाजवळच वाहनतळ

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
No Parking Zone
No Parking ZoneDainik Gomantak
Published on
Updated on

Morjim Parking Issue उन्हाळी पर्यटन संपले असले, तरी पावसाळ्यातही मोरजी किनारी भागात पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. देशाच्या विविध भागांमधून येणाऱ्या पर्यटकांची सोय खासगी जमीनमालकांनी आपले शॅक्स, रेस्टॉरंट, रिसॉर्टमध्ये केली असली, तरी त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय मात्र केली नसल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने कुठेही उभी केली जातात.

त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. विठ्ठलदासवाडा-मोरजी किनारी भागात नेहमीच प्रवाशांची गैरसोय होताना दिसते.

किनारी भागात पर्यटन व्यवसाय सुरळीत चालावा, यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. परंतु पार्किंग व्यवस्था आणि वाहतुकीचे नियम वाहनचालक पाळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात वाहतूक पोलिस खाते कमी पडत आहे.

दिवसेंदिवस पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. पर्यटन हंगाम ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत सुरू असतो. या हंगामात देश-विदेशातील लाखो पर्यटक किनारी भागात येतात. त्यावेळी पार्किंगची समस्या असतेच.

परंतु सध्या पावसाळ्यातही हीच समस्या कायम आहे. सलग शनिवार, रविवारी सुट्ट्या मिळाल्या तर देशातील विविध भागांतील पर्यटक किनारी भागात येऊन पर्यटनाचा आनंद पावसाळ्यातही लुटतात.

No Parking Zone
Banastarim Bridge Accident: चालक परेश सावर्डेकरच्या पोलिस कस्टडीत वाढ; पुढील सुनावणी 16 ऑगस्टला

‘नो पार्किंग’मध्ये बेशिस्त

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मोरजी पंचायत क्षेत्रात काही ठिकाणी नो पार्किंग झोन जारी केले आहेत. त्यानुसार मोरजी पंचायतीने ठिकठिकाणी नो पार्किंग झोन जाहीर केलेल्या जागेत नो पार्किंगचे फलक लावले आहेत.

परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक आहेत, त्याच ठिकाणी वाहने पार्क करून नियम धाब्यावर बसवतात. अशा बेशिस्त पर्यटकांवर कारवाईची मागणी होत आहे.

No Parking Zone
Panjim Road Issue: पणजीचे 'खड्ड्यांचे' ग्रहण काही सुटेना; सांतिनेजच्या रस्त्याची दुरवस्था

अरुंद रस्ते अन् वाहतूक कोंडी

जर पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था केली असती तर ही स्थिती निर्माण झाली नसती. विठ्ठलदासवाडा-मोरजी किनारी भागातील रस्ते अरुंद असून तेथेच दोन्ही बाजूला वाहने बेशिस्तपणे पार्क करून ठेवल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.

वाहतूक खात्याचे अधिकारी आणि पेडणे वाहतूक पोलिस यांनी या भागात येऊन जागोजागी होणारी वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com