आषाढी एकादशीचे औचित्य साधून हरी मंदिरात दिंडीचे आयोजन केले. आज कोंब मडगाव येथील विठ्ठल मंदिर येथे दिंडीचा पहिला गजर झाला. Dainik Gomantak
गोवा

Goa: डॉ.के ब हेडगेवार विद्यालय तर्फे हरी मंदीर येथे दिंडी

मंदिरात आरती, तिर्थप्रसाद घेऊन पसायदान व शांती मंत्राने दिंडीची सांगता झाली. विशिष्ट पोषाख व विठ्ठल-रखुमाईच्या वेशभुषेने अनेकांचे लक्ष वेधले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव (Madgaon) येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाने (Dr. K. B. By Hedgewar School) आषाढी एकादशीचे औचित्य साधून हरी मंदिरात दिंडीचे आयोजन केले. आज कोंब मडगाव येथील विठ्ठल मंदिर येथे दिंडीचा पहिला गजर झाला. तिथून दिंडी गोमन्त विद्या निकेतनाच्या प्रांगणात आली व तेथे रिंगण घालण्यात आले. विठ्ठल नामाच्या गजरात पाजीफोंड येथील हरी मंदिर परिसरात नाम घोष करीत नाचत उत्साहात भजन केले.

मंदिरात आरती, तिर्थप्रसाद घेऊन पसायदान व शांती मंत्राने दिंडीची सांगता झाली. विशिष्ट पोषाख  व विठ्ठल-रखुमाईच्या वेशभुषेने अनेकांचे लक्ष वेधले. य दिंडीत शिक्षक, पालक, व्यवस्थापक समितीचे पदाधिकारी आदी मंडळी सहभागी झाली. 

या वेळी सर्वांनीच सामाजिक नियमांचे पालन केले. अतिशय शिस्तबद्ध आणि सुनियोजित अशा या दिंडीचे सर्व स्तरातुन कौतुक झाले.

श्री विठ्ठल मंदिरात पॉप्युलर प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक.

मडगावच्या पॉप्युलर प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त खास कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम  निवडक विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थित झाला. सर्व प्रथम मुख्याध्यापिका सुचित्रा राजीव देसाई यांच्याहस्ते पालखीचे अनावरण करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी नंतर श्री विठ्ठल मंदिरात जाऊन अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला. 

या विद्यार्थ्यांमध्ये आरुष नाईक, माधुरी खेत्री, पुजा मलिक, पल्लवी हरिजन, आलिया अत्तर, शिवानी दिनलक्ष्मी, प्रिया राव यांनी भाग घेतला. तबला व पेटीवर समीर म्हाळशी व मोहित यांनी संगत केली. या वेळी विद्यालयातील प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक उपस्थित होते.

दीड दिवस अखंडपणे चाललेल्या या भजनी सप्ताहात श्री देवी भगवतीचा परिसर विठ्ठल नामांच्या गजरात दुमदुमून गेला होता.बुधवारी दुपारी उत्सवाची उत्साहात सांगता झाली.

मोरजी: कोरोना महामारीचे सावट असलेतरी आपल्या उत्सवावर त्याचे विरजण येवू न देता पार्सेच्या श्री भगवती देवस्थानात आषाढी एकादशी निमित्त अखंड भजनी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भाविक भक्तांनी श्री देवी भगवतीचे भक्तिभावाने दर्शन घेतले .

या आषाढी एकादशीच्या भजनाचे वैशिष्ट असलेल्या भजनी दिंड्या मर्यादित प्रमाणात झाल्या. विविध वाड्यावरून आलेल्या या दींड्या पारंपरिक पणे वाजत गाजत दिंडीसह येवू शकल्या नसल्या तरी श्री देवी भगवती मंडपामध्ये अखंडपणे भजनी मैफिली झाल्या यात स्थानिक कलाकारां बरोबर गोमंतकातील गायक कलाकारांनी भाग घेतला. दिंडिसह आलेले चित्रे याठिकाणी मंदिरात ठेवण्यात आली होती .दीड दिवस अखंडपणे चाललेल्या या भजनी सप्ताहात श्री देवी भगवतीचा परिसर विठ्ठल नामांच्या गजरात दुमदुमून गेला होता.बुधवारी दुपारी उत्सवाची उत्साहात सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT