गोवा

Fake News: गोव्यातील स्वातंत्र्यदिनाबाबत हिंदी, मराठी न्यूज पोर्टलनी दिली फेक न्यूज; गोमतंकीय संतप्त

Fake News About Goa: वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत समाज माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटल्या.

Pramod Yadav

पणजी: देशाची पर्यटन राजधानी असणाऱ्या गोव्याबाबत अनेक गैरसमज प्रचलित आहेत. शेकडो वर्षे गोव्यावर असणारी पोर्तुगीज राजवट, १४ वर्षे उशीरा मिळालेले स्वातंत्र्य आणि येथील पर्यटन व संस्कृतीबाबत बऱ्याचवेळा अनेक चुकीच्या बाबी समाजमाध्यमांवर पसवरल्या जातात.

अशाच एका अज्ञातातून प्रसिद्ध हिंदी व मराठी न्यूज चॅनलने गोव्यात १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही, असे चुकीचे आणि खोटे वृत्त प्रसिद्ध केले.

Fake News

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रसिद्ध हिंदी व मराठी न्यूज चॅनलने गोव्यात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही, अशा प्रकारचे दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले.

वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत समाज माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटल्या. बातमीतून चुकीचे माहिती प्रसिद्ध केल्याबाबत गोमंतकीयांना जाब विचारण्यास सुरुवात केली.

Fake News

गोव्यातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच, नागरिकांनी यांची गंभीर दखल घेत, चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर न्यूज चॅनलवर हल्लाबोल केला. सोशल मिडियावर याबाबत विचारणा होऊ लागल्याने, अखेर चूक लक्षात आलेल्या चॅनलने न्यूज चॅनलवरुन बातमी हटवली.

काँग्रेसकडून तक्रार दाखल

काँग्रेसने याप्रकरणाची गंभीर दखल घेत मराठी चॅनलविरोधात गोवा पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशाप्रकारे फेक न्यूज प्रसारीत करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली.

गोव्यात साजरे होतात दोन स्वातंत्र्यदिन

गोव्यात दोन स्वातंत्र्यदिन साजरे होतात. १५ ऑगस्ट रोजी देशभर साजरा होणारा स्वातंत्र्यदिन गोव्यात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच, १९ डिसेंबर रोजी देखील गोव्यात स्वातंत्र्यदिन (मुक्तीदिन) साजरा केला जातो. गोव्याला १४ वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले. १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने ऑपरेशन विजय राबवत गोमंतकाला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT