Vasco Dainik Gomantak
गोवा

Goa Narkasur 2023: वास्कोत 'मिनी नरकासुरा'ची धूम; चिमुकल्यांच्या कलाकारीने उपस्थित भारावले

Ganeshprasad Gogate

Goa Narkasur 2023: गोव्यात नरकासुर स्पर्धांचे केले जाणारे आयोजन हे सर्वश्रुत आहे. भलेमोठे, वेगवेगळ्या आकाराचे आणि निराळ्या रंगांचे, अक्राळविक्राळ नरकासुर दिवाळीच्या पूर्वसंध्येला अख्या गोवेकरांचे लक्ष वेधून घेतात.

यंदाही गोव्यात ठिकठिकाणी नरकासुराचा धूम पाहायला मिळाली. ग्रामीण भागासह शहरी भागातही रात्री निघणाऱ्या नरकासुर मिरवणुकीला स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यात वास्को येथे रंगलेल्या मिनी नरकासुर स्पर्धेला गोवेकरांनी विशेष उपस्थिती दर्शवत मोठा प्रतिसाद दिला.

मिळालेल्या माहितीनुसार वास्को येथे आयोजित केलेल्या नरकासुर स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून बालगोपाल मंडळींसाठी ही स्पर्धा आयोजित केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मोठ्यांच्या रात्री उशिरा निघणाऱ्या नरकासुर मिरवणुकीत आणि स्पर्धेत लहानांना सहभागी होता येत नाही. यामुळे त्यांचा काहीसा हिरमोड होतो. याच कारणास्तव मिनी नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे समोर आलंय.

मुलांच्या क्रिएटीव्हीटीला चालना-

गोवा ही कलाकारांची खाण असून येथेही प्रत्येक घरात एक तरी कलासक्त माणूस दिसून येतो. हीच कलाकारी इथल्या चिमुकल्यांमध्ये उतरली असून या मिनी नरकासुर स्पर्धेमुळे लहान मुलांची क्रिएटीव्हीटी वाढीस लागत आहे.

त्यांना सर्वांसमोर आपली कला दाखवण्याची संधीही या स्पर्धेमुळे मिळत असल्याचे येथे उपस्थित असलेल्या प्रेक्षक वर्गाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील करासवाडा येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

Professional League 2024: स्पोर्टिंग क्लबचा एफसी गोवाला धक्का! स्पर्धेतील सलग तिसरा विजय

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

SCROLL FOR NEXT