Diwali 2023 Dainik Gomantak
गोवा

Diwali 2023: दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

Diwali 2023: डिचोलीच्या बाजारात कर्नाटकमधून झेंडूच्या फुलांची आवक झालीय.

Ganeshprasad Gogate

Diwali 2023: दिवाळीच्या पूर्व संध्येला गोवेकर नरकासुर स्पर्धेचे दंग असल्याचे चित्र गोव्यातील प्रत्येक गावात दिसत आहे. दिवाळी हा सण तसा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीला गोडधोड फराळ करण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रात दिवाळी म्हटलं की किल्ले बनवून त्यावर शिवकालीन देखावे उभारले जातात. त्याचप्रमाणे गोव्यात दिवाळीपूर्व नरकासुर दहन (Narkasur In Goa) ही एक मोठी परंपरा आहे. नरकासुराच्या महाकाय प्रतिकृती आणि जल्लोषात निघणारी भव्य मिरवणूक काढून पहाटे नरकासुराचे दहन केले जाते.

गोव्यात सध्या दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळतोय. दिवाळीच्या निमित्ताने बाजार पेठा सजल्या असून डिचोलीच्या बाजारात कर्नाटकमधून झेंडूच्या फुलांची आवक झालीय. दसऱ्यावेळी या फुलांचे दर काहीसे महागले असून आताही आवक कमी असल्याने दर चढेच असल्याचे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे.

पणजी, मडगांव, म्हापसा, फोंडा या महत्वाच्या बाजारपेठा आकाशकंदील, पणत्या, फराळाचे साहित्य, फटाके आदी सामुग्रींनी सजल्या आहेत. दिवाळी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असल्याने घराघरातून लगबग सुरु असलेली आपल्याला पाहायला मिळतेय.

सांगे विकास समिती दत्तवाडी व महिला संघ, विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगे मतदारसंघ आणि पंचायत आयोजित इको फ्रेंडली नरकासूर स्पर्धा सांगे येथे पार पडली.

या स्पर्धेसाठी प्लॅस्टिक विरहित तसेच बँड बाजा टाळत नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे महिलांच्या गटांनी हे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला सुभाष फळदेसाई आणि त्यांच्या पत्नी अलका या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT