पणजी : सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर शिक्षण संचालकांनी घुमजाव करत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांत हजेरी लावणे बंधनकारक असल्याच्या आदेशात दुरुस्ती करत पुढील सुचनेपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत येऊ नये असा आदेश जारी केला आहे. यापूर्वी कोविड प्रसार वाढल्याने शाळांत विद्यार्थ्यांना बोलावण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत येणे सक्तीचे करण्यात आले होते. कोविड प्रसाराचा धोका असताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालत असल्याबद्दल सरकारवर टीका होऊ लागली होती.(Goa Director of Education amended the order)
शिक्षण संचालकांचा हा आदेश समाज माध्यमावर हास्यास्पद ठरला होता. अखेर शिक्षण संचालकांना आपल्या चुकीची जाणीव झाली असून त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना शाळेत न येण्यास मुभा दिली आहे. निकाल तयार करणे, शिकवणे, परीक्षा घेणे आदी कामे ऑनलाईन पद्धतीने पुर्ण करावीत असेही या आदेशात त्यांनी नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.