Goa Samarth E-Governance Portal Admission Dainiak Gomantak
गोवा

Goa Degree Admission: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! 12 मे पासून पदवी प्रवेशाची दुसरी फेरी; 'या' पोर्टलवर करता येणार नोंदणी

Goa Samarth E-Governance Portal Admission: उच्च शिक्षण संचालनालय (DHE), गोवा सरकार यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: उच्च शिक्षण संचालनालय (DHE), गोवा सरकार यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केली आहे. ही प्रक्रिया १२ मे २०२६ पासून सुरू होईल आणि २० मे २०२६ पर्यंत ‘गोवा उच्च शिक्षण संचालनालयाच्या गोवा समर्थ ई-गव्हर्नन्स’ पोर्टलवर उपलब्ध असेल.

विविध पदवी आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी अधिकृत पोर्टलवरhttps://goaadmission.samarth.ac.in ऑनलाइन अर्ज करू शकतात. दुसऱ्या फेरीमध्ये बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी.,बी.एस्सी. कृषी, बी.पी.ए. बी.एस्सी. गृहविज्ञान, बी.बी.ए. , बी.सी.ए., ​ए.एन.एम. आणि जी.एन.एम. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येणार आहेत.

कोण अर्ज करू शकतात ?

ज्यांचे अर्ज पहिल्या फेरीत अपूर्ण राहिले होते आणि ज्यांना आता प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

नवीन अर्जदार ज्यांनी पहिल्या फेरीत नोंदणी केली नव्हती.

ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत अर्ज केला होता परंतु त्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, असे विद्यार्थी जुन्या माहितीचा वापर करून लॉग-इन करू शकतात आणि आपले पसंतीचे महाविद्यालय किंवा अभ्यासक्रम बदलून पुन्हा अर्ज सादर करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे

​अर्जदारांना इयत्ता १२ वीची गुणपत्रिका , शाळा सोडल्याचा दाखला, लागू असल्यास वैध आरक्षण प्रमाणपत्र आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

​प्रवेशासंदर्भात कोणत्याही मदतीसाठी विद्यार्थी उच्च शिक्षण संचालनालय, गोवा सरकार यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा तांत्रिक मदतीसाठी अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT