'स्वदेश दर्शन' योजने (Swadesh Darshan Skim) अंतर्गत गोवा पर्यटन विकास महामंडळ (Goa Tourism Development Corporation) मार्फत पेडणे तालुक्यात अनेक प्रकल्प उभारले जात आहे, त्यात नवीन प्रकल्पाची भरणा किंवा जुने प्रकल्पाना गतीच नाही, किंवा जे पूर्ण झाले त्याची निगाच राखली जात नाही. स्वदेश दर्शन योजनेच्या निधीतून जंगल आणि कचऱ्याचे दर्शन आज धारगळ दोन खांब ते आरोबा (Dhargalim To Aaroba Road) या मुख्य रस्त्याच्या बाजूला नजर मारल्यास दिसून येते.
या कामाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी केली आहे. करोडो रुपये पाण्यात घालणाऱ्या लोकप्रतिनिधीना जनतेने जाब विचारण्याची गरज आहे, शिवाय बांधकामाची चौकशी सरकारने करून जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवा अशी मागणी आर्लेकर यांनी केली आहे. धारगळ पंचायत क्षेत्रातील दोन खांब ते आरोबा या मुख्य रस्त्याचे सुशोभीकरण स्वदेस दर्शन योजने अंतर्गत गोवा पर्यटन विकास महामंडळ यांनी सहा कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे, हे काम निकृष्ट दर्ज्याचे आहे जी फुटपाथ उभारलेली आहे त्याला ठिकठिकाणी तडे गेले, सर्वत्र झाडे झुडपे वाढलेली आहे. विजेचे खांब आहेत त्या खांबा खाली रात्रीचा अंधारच असतो. ठिकठिकाणी कचरा फेकला जातो, हा स्वदेश दर्शन प्रकल्प कचरा दर्शन देतो कि काय असा प्रश्न नागरिक विचारात आहे.
मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी घटनास्थळी भेट देवून तिथली पाहणी केल्यावर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितले, हा प्रकल्प एकदम निकृष्ट दर्जाचा आहे. जी फुटपाथ चालण्यासाठी उभारली आहे त्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली आहे. त्यातून माणसे चालू शकत नाही, शिवाय सर्वत्र कचरा साचलेला आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे या प्रकल्पाकडे लक्ष नाही, प्रकल्प उभारला आणि त्यांनी ३० टक्के कमिशन घेतले असा आरोप करून आता हा प्रकल्प वाऱ्यावर सोडलेला आहे, कोणीच देखरेख केली नाही. आता सरकारने या प्रकल्पाची पूर्ण चौकशी करावी अशी मागणी प्रवीण आर्लेकर यांनी केली आहे
दरम्यान मोरजी येथील श्री मोरजाई देवस्थानच्या सहकार्याने खिंड परिसराचे पर्यटन महामंडळा तर्फे स्वदेश दर्शन योजनेतील पावणे पाच कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले , गेल्यावर्षी या प्रकल्पाचे उद्घाटन पणजी राजधानी येथून केले , मात्र आज पर्यंत या ठिकाणी असलेल्या सुविधा फिरायला येणाऱ्या पर्यटकाना उपलब्ध नाही. तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी दूरदृस्ठी ठेवून मोरजाई देवस्थान च्या जमानिचा ना हरकत दाखला घेवून एक आकर्षित प्रकल्प स्वदेश योजना केंद्रीय निधीतून उभारला. मागच्या तीन वर्षापासून हा प्रकल्प पूर्ण झाला मात्र पूर्णपणे जनतेला खुला झाला नाही . एक आकर्षित प्रकल्प त्यात बालगोपालासाठी उद्यात खेळण्यासाठी साधन सुविधा , कॉफी सेंटर योगा सभाग्रह , स्टोल आदी सुविधांचे नियोजन केले , शिवाय वॉकिंग ट्रेक , सायकल ट्रेक बनवलेला आहे ,
करोडो रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारलेला आहे , उद्घाटनही झाले मात्र अजूनपर्यंत दुकाने स्टोल हॉटेल खुली झाली नाहीत हि खुली झाली असतीतर पर्यटक खाते आणि देवस्थान समितीला महसूल मिळाला असता मात्र सरकारने चालढकल केलेली आहे . किनाऱ्या पलीकडील पर्यटन क्षेत्राला सरकार वाव देत आहे , वर्षाचे ३६५ दिवस पर्यटनाला वाव देण्यासाठी राज्य सरकार विविध पर्यटन क्षेत्रासाठी योजना आखत आहे , हल्लीच्या काळात समुद्र किनारे बदनाम होत असल्याने किनाऱ्या पलीकडील नवनवीन पर्यटन स्थळांचा शोध घेत असतात , सरकारचे पर्यटन खातेही गावा गावातील नवनवीन पर्यटन स्थळाचा विकास करण्यावर भर देत असतात , त्याच नजरेतून माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी खिंड मोरजी परिसराचा वर्षाचे १२ बाराही महिने या ठिकाणी पर्यटक यावेत त्या दृस्ठीने या परिसराचे आकर्षित सुशोभीकरण केले . पर्यटनाला वाव देण्यासाठी हे सुशोभीकरण आवश्यक होते आणि सरकारने केले सुद्धा , मात्र त्याचा उपयोग उद्घाटन करूनही हवा तसा होत नाही , दुकाने स्टोल कार्यरत झाली नाही .
या विषयी पर्यटन विकास महामंडळ चेरमेन व मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांच्याकडे संपर्क साधला असता .किनाऱ्यापलीकडील पर्यटनाला वाव देण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वदेश योजने अंतर्गत ,पडणे तालुक्याचा विचार केला तर मोरजाई मंदिर , खिंड मोरजी , पार्से येथील श्री भगवती मंदिर व खाजन गुंडो , मांद्रे येथील श्री भगवती सप्तेश्वर , अश्वे किनारी पार्किंग , हरमल यथील मुख्य रस्त्याचे सुशोभीकरण ,कोरगाव येथील श्री कमळेश्वर मंदिर , पेडणे येथील श्री भगवती मंदिर परिसर , मालपे ते पेडणे शहर , धारगळ दोन खांब ते आरोबा , धारगळ म्हखाजन राममंदिर , वारखंड येथील माऊली मंदिर , वजरी या ठिकाणी पर्यटन महामंडळ , पर्यटन खात्या अंतर्गत स्वदेश योजना निधी मार्फत कामे सुरु आहेत . त्यातील काही कामांना गती मिळाली तर काही कामे आजही भूमिपूजन करून कामे लेलेली नाहीत काही कामे पूर्णत्वाकडे आले तर काही कामांचा दर्जा घसरलेला आहे . हा प्रकल्प कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आला.
पार्से येथील खाजनगुंडो
जलसिंचन खात्या अंतर्गत पार्से येथील खाजन गुंडो या बांधाचे न भूतो न भविष्यती असे सुशोभीकरण केले एकूण पावणे चार कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करून एक आकर्षित पर्यटन स्थान बनवले आहे , ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच काही प्रमाणात कामाचा दर्जा घसरल्याने ठीक ठिकाणी बांधकाम खचलेले दिसून येते. पर्यटकासाठी हे स्थळ एक वरदान ठरत आहे . तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. पार्सेकर यांनी या परिसराचे सुशोभीकरण करताना परिसरातील शेतीव्यवसायाला प्राधान्य मिळावे त्या नजरेतून या बांधला मजबुती दिली , मात्र या बांधाचा शेतीसाठी एक टक्काही फायदा झाला नाही , उलट दिवसेंदिवस शेती पडींग ठेवण्यावर आकडा वाढत आहे. पूर्वी हा बांध फुटून पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात शापोरा नदीचे खारे पाणी शेतात येवून नुकसानी व्हायची . बंध पक्का बांधल्यानंतर या परिसरातील शेतीचे मळे फुलतील बहरतील अशी अपेक्षा होती , मात्र मळे शेतीतून फुलले नाही उलट ओसाड पडलेत .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.