Dhargal Gram Sabha | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: धारगळ ग्रामसभेत आमदार अनुपस्थित

Goa News: ग्रामस्थ नाराज : अपघातप्रवण क्षेत्राबाबतचा प्रश्‍न कायम

दैनिक गोमन्तक

Goa News: दोन खांब धारगळ येथील महामार्ग 17 हा जीवितास धोकादायक झाला असल्याने आणि या मार्गांवर उड्डाणंपुल बांधण्याचे प्रोव्हिजन केलेले असतानाही तो बांधला नसल्याने गेल्या महिन्यात आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या उपस्थित ग्रामसभा घेण्यात आली.

रविवारच्या ग्रामसभेत विषयावर चर्चा होणार होती, पण आमदारच आले नाही, त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त करण्यात आली. अपघात प्रवण क्षेत्राबाबत प्रश्‍न कायम राहिला. पंधरा दिवसात पेडणे व मांद्रेचे आमदार आणि संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या समक्ष पुन्हा ग्रामसभा घेण्यात यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी होती.

पण दोन्ही आमदार व एक साहाय्यक अधिकारी कमलाकांत कारापूरकर व आमदार जीत आरोलकर यांच्या प्रतिनिधीशिवाय कोणीही 13 रोजीच्या ग्रामसभेला आले नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गेल्या पंधरा दिवसापूर्वी धारगळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुमारे दोनशे ग्रामस्थांच्या उपस्थित झाली.

त्यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी या दोनखांब धारगळ येथे अपघात क्षेत्र निर्माण झालेले असतानाही आणि या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे प्रोव्हिजन केले होते. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या मार्गांवर अपघात वाढत चाललेले आहेत.

रस्ता कामांच्या पाहणीसाठी समिती

रस्ता कामाच्या पाहणीसंदर्भात सरपंच अनिकेत साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती काढण्यात आली. सर्वेश करापूरकर, सम्राट सोयरोजी, भारत बागकर, महेश देसाई, मधुरा गाडगीळ, पुंडलिक धारगळकर, सुरेश कारापुरकर, रुपेश कुब्रलकर, संदेश राऊळ, शुभांगी कौठणकर, नारायण साळगावकर, दुर्गाप्रसाद, सिद्देश धारगळकर, आश्वेक नाईक, सदानंद पार्सेकर, सिद्धेश नारोजी, अशोक आरोंदेकर, नवसो मयेकर, गिरीष कामत, साईशा, आवेलीन रॉड्रिगीस यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT