Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory चं धक्कादायक वास्तव उघड! साखरच काय, इथेनॉल निर्मितीसाठीही सरकारची उदासीनता

कंपन्या तयार मात्र, सरकारकडून असहकार

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjivani Sugar Factory मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक खासगी भागीदारीतून संजीवनी सहकारी साखर काऱखाना पुन्हा सुरू करण्याचा मनोदय ‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमातील एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला असला, तरी प्रत्यक्षात तेथे साखर उत्पादित होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

धारबांदोडा येथील या बंद पडलेल्या कारखान्याचे रूपांतर इथेनॉल निर्मिती प्रकल्पात करण्यासाठी दोन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. मात्र, सरकारने त्यांना प्रतिसादच दिला नाही, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा कारखाना पुन्हा सुरू करणे अवघड आहे, हे सरकारी यंत्रणेला कळून चुकले आहे. या कारखान्यात वापरलेले तंत्रज्ञान अत्यंत जुने आणि टाकावू झाले आहे. शिवाय यंत्रांचे सुटे भाग मिळणेही दुरापास्त झाले आहे.

जगभरात आता साखरेची आयात-निर्यात सुरू झाली आहे. त्यामुळे साखर कारखाने धडाधड बंद पडू लागले आहेत. सरकारने इथेनॉल प्रकल्पासाठी देकारही मागवले होते. दोन खासगी कंपन्यांनी देकार सादर केले होते.

त्यानंतर त्यांच्याकडून बोली स्वीकारण्याची प्रक्रिया करणे बाकी होते. त्यानंतर हा सारा विषय शीतपेटीत गेल्यातच जमा झाला होता. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी कारखाना सुरू करण्याविषयी सरकार गंभीर आहे, असे नमूद केले आहे.

सल्ला दिला पण...

साखर कारखाना चालवणे, ही आता नफा कमावण्याची गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात नेमलेल्या सरकारी समितीने साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मितीच्या पर्यायावर विचार करावा, असे यापूर्वीच सुचवले आहे.

राज्यात ऊस उत्पादक शेतकरी अन्य पर्यायांकडे वळत नसल्याने त्यांनी उत्पादित केलेला ऊस घेण्यासाठी इथेनॉल उत्पादन करणारा कारखाना सुरू करण्याचा सल्ला या समितीने सरकारला दिला आहे.

पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ‘संजीवनी’त साखर उत्पादन व्यवहार्य ठरणार नसल्याने इथेनॉल निर्मिती करावी, असे सुचवले आहे. सरकारनेच निर्णय घेऊन कार्यवाही करावी.

- ॲड. नरेंद्र सावईकर, अध्यक्ष, शेतकरी समन्वय समिती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

SCROLL FOR NEXT