Black Panther Dainik Gomantak
गोवा

Black Panther In Dharbandora: धारबांदोड्यात ब्लॅक पँथर, 15 पाळीव प्राण्यांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये घबराट

Black Panther In Dharbandora अतुल नाईक यांच्याघराच्या सीसीटीव्हीमध्ये हा ब्लॅक पँथर मांजर तोंडात पकडून पळत असल्याचे कैद झाले आहे

Ganeshprasad Gogate

Black Panther In Dharbandora सांकोर्डा येथे काही दिवसांपूर्वी दिसलेला ब्लॅक पँथर शुक्रवारी धारबांदोरा येथे cctv कॅमेऱ्यात कैद झालाय. धक्कादायक म्हणजे तेथे त्याने गावातील पाळीव कुत्र्यांना ठार मारल्याचेही बोलले जातेय. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

धारबांदोडा येथील अतुल नाईक यांच्याघराच्या सीसीटीव्हीमध्ये हा ब्लॅक पँथर मांजर तोंडात पकडून पळत असल्याचे कैद झाले आहे. नंतर या बिबट्याने एका पाळीव कुत्र्यालाही ठार मारल्याची माहिती समोर येतेय.

या घटनेची माहिती कोळे येथील वनविभागाला गुरुवारी देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने परिसराला भेट दिली असता या ब्लॅक पँथरने गावातील 15 हून अधिक पाळीव कुत्र्यांना ठार मारल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

तत्पूर्वी 1 एप्रिल रोजी बाळी केपे येथे एका ब्लॅक पँथरला वनविभागाने सापळा रचत पकडल्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीनंतर ब्लॅक पँथरला वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले होते.

दरम्यान गोव्यातील ग्रामीण भागात वन्यजीवांचा संचार वाढला असून काही महिनांपूर्वी सावईवेरे, भुईपाल, सुर्ला या भागात बिबट्याने दहशत माजवली होती.

वाढत्या शहरीकरणामुळे आणि जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे जंगलांचे प्रमाण कमी होत चालले असून वन्यप्राणी मानवी वस्तींकडे फिरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT