Netravali: अवकाळीचा फटका, गोठ्यावर झाड कोसळले... नेत्रावळीत आठ गायी थोडक्यात बचावल्या

मंगळवारी राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली
Netravali
Netravali
Published on
Updated on

Netravali: गोवा-कर्नाटक सीमेवरील गावातील दुर्गम भाग असलेल्या आंदेपाडा-नेत्रावली येथे काजूचे झाड कोसळून गोठ्याची नासधूस झाली. दरम्यान, या दुर्घटनेत सुदैवाने आठ संकरीत जर्सी गायी बचावल्या.

मंगळवारी राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यावेळी या देखील गावाला देखील पावसाने झोडपून काढले, त्याचवेळी ही घटना घडली.

मालक भिकू गावकर यांनी घटनेच्या अर्धा तास आधी आठही गायी शेडमधून चरण्यासाठी बाहेर सोडल्या आणि मोठी हाणी टळली. अपघातात त्यांना सर्व गुरे गमवावी लागली असती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेत गोठ्याचे मोठे नुकसान झाले असून, एस्बेस्टोस पत्रे आणि सिमेंट खांबांची मोडतोड झाली असून सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

भिकू गावकर दुग्धव्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर पूर्णपणे अवलंबून आहेत. गोठ्याच्या पुनर्बांधणीसाठी पुरेसे पैसे गोळा जमवता येत नसल्याने अधिकाऱ्यांकडून तातडीने आर्थिक मदतीची मागणी गावकर यांनी केली आहे.

दरम्यान, घटनेनंतर स्थानिक प्रभाग पंचायत सदस्य राखी नाईक यांनी भिकू गावकर यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावकर यांच्या गोठ्याचे नुकसान जाणून घेण्यासाठी आणि भरपाईच्या प्रक्रियेसाठी तलाठ्यांनी गावकर यांच्या गोठ्याचा पंचनामा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com