DGP Jaspal Singh  Dainik Gomantak
गोवा

Goa DGP: 'गोव्यात ड्रग्ज तस्करीला स्थानिकांचे सहकार्य', पोलीस महासंचालक म्हणतात त्याशिवाय हे शक्यच नाही

बाणस्तारी अपघाताच्या तपासात कोणताही राजकीय दबाव नसल्याचे जसपाल सिंग म्हणाले.

Pramod Yadav

Goa DGP On Drug Trade In State: गोव्यात होणारी अमली पदार्थांची तस्करी पोलीस आणि राज्य सरकार या दोघांसाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय राहिला आहे. राज्यात वारंवार ड्रग्ज विरोधातील कारवाई सुरूच आहेत.

अशात राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. सिंग यांनी राज्यातील अमली पदार्थ तस्करीत स्थानिकांचे सहकार्य असल्याचे म्हटले आहे.

जसपाल सिंग यांनी एका स्थानिक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांना अमली पदार्थांच्या तस्करीबाबत प्रश्न विचारण्यात आला.

गोव्यातील अमली पदार्थ तस्करीला स्थानिकांचे सहकार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुप्त पद्धतीने होणाऱ्या या तस्करीत, स्थानिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही. आमच्या माहितीनुसार, या तस्करीत स्थानिक, परराज्यातील आणि परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. गोव्यात अमली पदार्थांचे सेवन केले जाते आणि येथे सहज मागणी देखील आहे. असे सिंग म्हणाले.

राज्यात ऑगस्टमध्ये झालेल्या बाणस्तारी येथील अपघाताच्या तपासात काही राजकीय दबाव आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. बाणस्तारी अपघाताच्या तपासात कोणताही राजकीय दबाव नसल्याचे जसपाल सिंग म्हणाले. प्राथमिक तपास योग्य दिशेने सुरू आहे. काही जणांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोणताही राजकीय दबाव नाही. अशा प्रकारचा कोणताही फोन कधी आला नाही. असे स्पष्टीकरण सिंग यांनी दिले.

राज्यात गंभीर पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत घट झाली आहे. राज्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये 36 टक्के घट झाल्याचे सिंग यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT