Goa Development Fund Dainik Gomantak
गोवा

Goa Development Fund: 'गोव्याच्या विकासासाठी भरपूर निधी देऊ'; फोंड्यात शिवराजसिंह चौहान यांचे आश्वासन, 80 कोटींच्या धनादेशांचे वितरण

Seva Sankalp Abhiyan: फोंडा येथील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे गोवा राज्य समृद्ध आहेच; पण अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारने केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: येथील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे गोवा राज्य समृद्ध आहेच; पण अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारने केला आहे. केंद्राकडून गोव्याच्या विकासासाठी भरपूर निधी देऊ, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज दिले.‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेंतर्गत सेवा संकल्प अभियान कार्यक्रम फोंडा येथील सनग्रेस गार्डन सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी मंत्री चौहान बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती गणेश गावकर, आमदार उल्हास तुयेकर, प्रेमेंद्र शेट, डॉ. दिव्या राणे, मुख्य सचिव कंदवेलू आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत उपक्रमांतर्गत गोव्याचा सर्वंकष विकास होत असून या विकासात पुरुषांबरोबरच महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. गोवा कृषिप्रधान राज्य असून कृषी उत्पादनांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होताना गोव्यातील कृषी उत्पादनांची निर्यात करण्यावर भर दिला जाणार आहे. गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती केली असून हे राज्य अधिक समृद्ध करण्यासाठी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

८० कोटींच्या धनादेशांचे वितरण

यावेळी सेवा संकल्प अभियानात सहभागी नागरिक व संस्थांचा मंत्री चौहान यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विविध उपक्रमांसाठी सुमारे ८० कोटी रुपयांचे धनादेश देण्यात आले. सकाळी कदंब बसस्थानक परिसरात शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणासह स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Contract Teachers Protest: 22 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य करा; अन्यथा 23 पासून बेमुदत उपोषण, कंत्राटी शिक्षकांचा सरकारला इशारा

PM Kisan Portal Update: 24व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान पोर्टलमध्ये मोठा बदल! शेतकऱ्यांसाठी 4 महत्त्वाच्या सुविधा सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

Goa CZMP: 30 लाखांमुळे लटकला 'कुशावती'चा आराखडा; नव्या जिल्ह्याच्या समावेशासाठी अतिरिक्त निधीची मागणी

Asian Games Gold Medal Final: IND vs PAK फायनलवर पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना मिळणार सुवर्णपदक? नियम काय सांगतो?

SCROLL FOR NEXT