Goa Development Architects Dainik Gomantak
गोवा

Goa Development Architects: गोव्याचा विकास पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध हवा! CM सावंत यांनी अधोरेखित केले वास्तुविशारदांचे महत्त्व

Pramod Sawant Architects Statement: गोव्याच्या बांधकाम क्षेत्राचा विकास करताना नावीन्यपूर्ण रचना, शाश्वत विकास आणि व्यावसायिक गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या बांधकाम क्षेत्राचा विकास करताना नावीन्यपूर्ण रचना, शाश्वत विकास आणि व्यावसायिक गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. राज्याच्या बांधकाम क्षेत्राला योग्य दिशा देण्याबरोबरच पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध विकासाला चालना देण्यात वास्तुविशारदांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दोनापावला येथील गोवा आंतरराष्ट्रीय केंद्रात भारतीय वास्तुविशारद संस्था (आयआयए), गोवा शाखेच्या २०२६-२०२८ या कालावधीसाठी नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारी समितीचा पदग्रहण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी वास्तुविशारद अमित सुखटणकर, वास्तुविशारद शिरीष पेरी तसेच वास्तुविशारद क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नवनियुक्त कार्यकारी समितीचे अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. गोव्याच्या बांधकाम क्षेत्राच्या विकासात ही समिती प्रभावी योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या विकासाच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक वास्तुरचना, पर्यावरण संवर्धन आणि व्यावसायिक कौशल्य यांचा समतोल साधण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "डॉक्टर, मुझे टेस्ट कराना होगा...", IPL 2027 मध्ये धोनी खेळणार की नाही? माहीने स्वतःच दिले मोठे संकेत, पाहा व्हिडिओ

Government Employees Salary: गोवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी! वेतन निश्चितीचा पर्याय निवडण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत

Rafale Marine Flight Tests: गोव्यात 'राफेल मरिन'ची पुन्हा चाचणी! 'आयएनएस विक्रांत'वर तैनातीपूर्वी महत्त्वाचे परीक्षण

पहाटेच्या खनिज वाहतुकीला ग्रामस्थांचा ब्रेक! पिळगावात 'वेदांता'चे ट्रक अडवले; 2 तासांनी वाहतूक सुरू

खरी कुजबुज: निष्ठावंतांना संधी!

SCROLL FOR NEXT