Deputy Speaker of the House Joshua D'Souza And PM Narendra Modi Joshua D'Souza Instagram
गोवा

मोदीजी माझ्या लग्नाला यायचं हं! गोव्याच्या उपसभापतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले लग्नाचे आमंत्रण

Goa Deputy Speaker of the House Joshua D'Souza: म्हापसाचे आमदार आणि गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसुझा लवकरच लग्नाच्या बंधनात अडकरणार आहेत.

Pramod Yadav

Goa Deputy Speaker Joshua D'Souza Invites PM Modi to Wedding

म्हापसा: गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसुझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. जोशुआ यांनी नवी-दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना लग्नपत्रिका दिली. मोदींशी भेटीचा फोटो जोशुआ यांनी Instagram वर शेअर केला आहे.

म्हापसा मतदारसंघाचे आमदार व विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसुझा लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. लग्नाचे आमंत्रण जोशुआ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी मनमोकळा संवाद झाला. मोदींना माझे वडील फ्रान्सिस डिसोझा यांची आठवण काढली. माझ्या वडिलांनी गोव्यासाठी दिलेल्या योगदानाचा मोदींनी उल्लेख केला. मोदींना माझ्या वडिलांच्या केलेल्या उल्लेखामुळे मी फारच भारवून गेलो, असे जोशुआ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांची नम्रता आणि जिव्हाळा यामुळे हा संवाद खरोखरच अविस्मरणीय झाला. या विशेष प्रसंगी त्यांचा मिळालेला वेळ, मार्गदर्शन आणि आशीर्वाद यासाठी मी कृतज्ञ आहे, असे जोशुआ यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT