Clive Anthony Gracias Dainik Gomantak
गोवा

Carnival Goa 2024: ठरलं! यंदाचा 'किंग मोमो' क्लाईव्ह अँथनी ग्रासियस; सहाजणांच्या ऑडिशनमधून झाली निवड

Carnival Goa 2024: किंग मोमो हे एक काल्पनिक पात्र आहे. याला कार्निव्हलचा प्रतीकात्मक राजा मानले जाते.

Ganeshprasad Gogate

Carnival Goa 2024: बहुचर्चित कार्निव्हल उत्सवाला 10 फेब्रुवारी पासून सुरुवात होत असून या कार्निव्हलचे मुख्य आकर्षण असलेल्या किंग मोमो निवडण्यासाठी पर्यटन विभागाने निवड प्रक्रिया सुरु केली होती.

यावेळी निवड प्रक्रियेत सहभागी झालेल्या एकूण सहा अर्जदारांची चाचणी केली होती.

चाचणी नंतर कार्निव्हल 2024 साठी किंग मोमो म्हणून क्लाईव्ह अँथनी ग्रासियस (Clive Anthony Gracias) यांची निवड करण्यात आली.

क्लाईव्ह यांची निवड त्यांच्या मनमोहक व्यक्तिमत्व, उत्कृष्ट संवाद कौशल्य आणि सादरीकरणावर आधारित होती.

मागील वर्षीच्या म्हणजेच 2023 च्या कार्निव्हलसाठीचा किंग मोमोचा म्हणून मडगाव येथील रसल डिसुजा (Russel D'Souza) यांची निवड करण्यात आली होती.

किंग मोमो हे एक काल्पनिक पात्र आहे. याला कार्निव्हलचा प्रतीकात्मक राजा मानले जाते. जगभरातील प्रथेनुसार, यासाठी लठ्ठ, आनंदी व्यक्तीची निवड केली जाते.

गोवा कार्निव्हलचा किंग मोमो 'खा, पिये आनि मज्जकर' अर्थात 'खा, प्या आणि आनंद घ्या' या संदेशासह शाही पोशाख करून या कार्निव्हलमध्ये दमदार एन्ट्री करतो.

गोव्यातील चिंचणी येथील रहिवासी असलेल्या क्लाइव्ह यांनी लहानपणापासूनच किंग मोमो होण्याचे स्वप्न बाळगले होते. अखेर त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत आहे.

यंदा १0 ते 13 फेब्रुवारी गोव्यात कार्निवल होणार असून पणजीतील कार्निवल फ्लोट हे पाटोपासून कला अकादमीकडे जाणार आहेत.

यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून यावेळी फ्रान्सिस्को मार्टिन यांचा 58 वर्षे कार्निवलमधील योगदानाबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.

फ्लोट नोंदणीसाठी 31 जानेवारीपासून अर्ज द्यायला सुरुवात होणार असून 5 फेब्रुवारी ही शेवटची तारीख अशी माहिती पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT