काणकोण सामाजिक आरोग्य केंद्र. Dainik Gomantak
गोवा

Goa: काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या सेवा सुविधांत वाढ करण्याची मागणी

बाल तज्ञ डॉक्टर सद्या आठवड्यातून एकदाच या आरोग्य केंद्रात उपलब्ध होत आहे; किमान आठवड्यातून तीन वेळा या डॉक्टरची सेवा केंद्रात उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

Subhash Mahale

Goa: काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या सेवा सुविधांत वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.ही मागणी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत शनिवारी काणकोणच्या दौऱ्यावर येत आहेत या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात येत आहे.बाल तज्ञ डॉक्टर सद्या आठवड्यातून एकदाच या आरोग्य केंद्रात उपलब्ध होत आहे किमान आठवड्यातून तीन वेळा या डॉक्टरची सेवा केंद्रात उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

प्रसुती तज्ञ डॉक्टर आठवड्यातून फक्त शुक्रवारी या केंद्राला भेट देत असतो काही वेळा पंधरा दिवसांनी तो उपलब्ध होतो.त्याच्या गैरहजेरीत वैद्यकीय अधिकारी या बाह्यरुग्ण विभागाची जबाबदारी सांभळतो त्यासाठी दिवसाआड या डॉक्टरची सेवा केंद्रात उपलब्ध करावी.

केंद्रात सर्जनची जागा अनेक वर्षे रिकामी आहे ती त्वरीत भरण्याची गरज आहे.अल्ट्रासाउंड यंत्रणा केंद्रात उपलब्ध आहे मात्र रेडिओ लॉजिस्टची नेमणूक न केल्याने ती कूचकामी ठरली आहे.काही वर्षामागे ग्रामीण उप आरोग्य केंद्रात रोज बाह्यरुग्ण तपासणी केली जात होती मात्र केंद्रात डॉ क्टरांचा अभाव असल्याने ही सेवा बंद झाली आहे.माशे,आगोंद खोला या दूरवरच्या आर एम डी एस केंद्रात दररोज बाह्यरूग्ण तपासणी सेवा तसेच उप आरोग्य केंद्रात दिवसाआड बाह्यरुग्ण तपासणी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी किमान पांच डॉ क्टराची नेमणूक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

लोलये येथील उप आरोग्य केंद्र.

लोलये,कोळंब,तळपण,भाटपाल,पैंगीण उप आरोग्य केंद्रे भाड्याच्या जागेत आहेत काही इमारती मोडकळीस आल्या आहेत त्यासाठी ही केंद्रे आरोग्य खात्याने सरकारी इमारती उभारून त्याजागी स्थलांतरित करण्याची तातडीने गरज आहे. काणकोणात खोतीगाव व गांवडोंगरी ही दोनच उप आरोग्य केंद्रे सरकारी मालकीच्या जागेत कार्यरत आहेत मात्र या इमारतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.आरोग्य केंद्राच्या लॅबोरेटरी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे रूग्णांना तपसणी रिपोर्ट मिळण्यास दिरंगाई होत आहे त्यासाठी लॅबोरेटरी विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.केंद्रात सर्व्हंटच्या चार जागा रिक्त आहेत.प्रत्येक उप आरोग्य केंद्र व आर एम डी एस मध्ये प्रत्येकी एक आया नेमण्याची गरज आहे सद्या हे काम उप आरोग्य केंद्रातील कर्मचारी हाताळत आहेत.

सामाजिक आरोग्य केंद्राजवळील जुन्या कर्मचारी सदनिकांची दूरवस्था झाली त्याची तातडीने दुरुस्ती करून वेगवेगळ्या बाह्यरुग्ण तपासणी साठी त्याचा वापर करणे शक्य आहे अन्यथा दोन- तीन वर्षात या सदनिका कोसळण्याचा धोका आहे.केंद्रात किरकोळ ऑपरेशन करण्याचे ऑपरेशन थिएटर आहे मात्र मनुष्य बळाऐवजी ते बंदच आहे.ते सुरु केल्याने काणकोणवासीयाना त्याचा फायदा होणार आहे.केंद्रात कर्मचारी व डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.

लोलये येथील ग्रामीण आरोग्य केंद्र खाजगी भाड्याच्या जागेत आहेत.ती जागा मोडकळीस आली आहे त्यासाठी हे उप आरोग्य केंद्र सर्वशिक्षा अभियानाच्या लोलये येथील इमारतीत स्थलांतरित करण्याची मागणी लोलयेचे पंचायतीचे सरपंच सचिन नाईक यांची मागणी होती त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसहीत सर्वाना निवेदन देण्यात आले आहे.काणकोणच्या आरोग्य सेवेविशयी शनिवारी मुख्यमंत्री काणकोणात आल्यावेळी त्याना पुन्हा निवेदन देण्यात येणार असल्याचे लोलयेचे सरपंच सचिन नाईक यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT