पणजी: केंद्र सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत (डीबीटी) विविध सामाजिक योजनांचा लाभ घेणाऱ्या गोमंतकीय लाभार्थींची संख्या दोन वर्षांत ९,१९१ ने, तर अर्थसाहाय्य सुमारे १० कोटींनी घटल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेतील लेखी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
गोव्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने अनेक सामाजिक योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. या योजनेच्या अर्थसाहाय्याचा लाभ लाभार्थींना तत्काळ मिळावा, यासाठी केंद्र सरकारने १ जानेवारी २०१३ रोजी ‘डीबीटी’ ही योजना सुरू केली.
या योजनेद्वारे सरकारी अनुदान आणि त्याचा लाभ थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जातो. अर्थसाहाय्य योजनेतून नागरिकांची फसवणूक होऊ नये, पारदर्शकता वाढावी तसेच योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान किंवा निधी लाभार्थींपर्यंत वेळेवर पोहोचावा, या दृष्टीने केंद्र सरकारने ही योजना कार्यान्वित केली.
‘डीबीटी’चे लाभार्थी आणि अर्थसाहाय्य
वर्ष लाभार्थी अर्थसाहाय्य (सुमारे कोटींत)
२०२२–२३ ७३,५११ ३९.९७
२०२३–२४ ५३,१७३ ३२.२१
२०२४–२५ ६४,३२० २९.२३
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.