Goa: Bridge Getting Danger in Morle. Dainik Gomantak
गोवा

Goa: धोकादायक असूनही पदपूलावरून वाहतूक

बागवाडा-मोर्ले (Morle, Goa) येथील वाळवंटी नदीवरील पूलालाही (Bridge) धोका निर्माण झाला आहे.

Mahesh Karpe

पर्ये : पुराच्या तडाख्यात पैकुळ-सत्तरीतील पूल कोसळले. त्याचप्रमाणे बागवाडा-मोर्ले (Morle, Goa) येथील वाळवंटी नदीवरील पूलालाही धोका (Dangerous Bridge) निर्माण झाला आहे. हा पदपूल कमकुवत झाल्याने कधीही कोसळण्याची शक्यता आहे. हा पूल कमकुवत असून, त्यावरून वाहतूक न करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने बजावले आहे. मात्र, बागवाडा- पेळावदा येथील नागरिकांना अन्य पर्याय नसल्याने या मार्गावरून दुचाकी वाहतूक सुरू आहे. तेव्हा तो धोकादायक बनला आहे. मोर्ले-सत्तरीतील गिमईवाडा येथून बागवाड्याला जोडणारा हा पदपूल वाळवंटी नदीवर आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी याचे बांधकाम झाले होते. हा जुनाट पूल पूर्णपणे कमकुवत बनला आहे. पुलाखालील भागाचा सिमेंटचा गिलावा उखडला आहे, तर काही ठिकाणी लोखंडी सळ्या दिसत आहेत. त्यामुळे तो पूर्णपणे कमकुवत बनला असून, पाण्याच्या मोठ्या प्रवाहात तो कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारने याला पर्याय म्हणून नवीन पूल उभारावा, अशी मागणी केली जात आहे.

बागवाडा-पेळावदावासीयांना नदीपलीकडे म्हणजे मोर्ले-साखळीच्या मुख्य रस्त्यावर येण्यासाठी या पुलाची उभारणी केली होती. त्यावेळी पादचारी या पुलाचा वापर करीत असत. पण, कालांतराने या पुलावरून दुचाकी वाहनांची ये-जा होऊ लागली. आता तर येथून धनगरवाडा, पेळावदा, बागवाडा येथील दुचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. पूल या भागातील लोकांसाठी महत्त्‍वाचा दुवा बनला आहे. पण तो वाहून गेला, तर इथल्या लोकांसाठी मोठी समस्या निर्माण होणार आहे. दोन वर्षांपूर्वी वाळपईतील सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाचे परीक्षण करून हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. तसेच यावरून वाहतूक करू नका, असेही बजावले होते. येथील लोकांना आणखी पर्याय उपलब्ध नसल्याने येथून प्रवास सुरू आहे. दरम्यान सा.बां. खात्याने येथे वाकलेल्या खांबांच्या कमानीला लोखंडी चॅनल्स बसवले होते. बागवाडा पूल कमकुवत असल्याने याला नवीन पर्यायी पूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. तसेच येथे नवीन पुलासाठी इथल्या लोकांनी आंदोलनही केले होते. त्यांची मागणी पूर्ण न केल्याने सरकार नवीन पूल उभारण्‍यासाठी हा जुना पूल पडण्याची वाट पाहत आहे काय?, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT