Goa crime Dainik Gomantak
गोवा

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Goa murder case: ३० ऑगस्ट २०२० साली रात्री साडेदहाच्या सुमारास खुनाची घटना घडली होती. संशयितांनी एडिसन याच्यावर फावड्याने हल्ला करून त्याचा खून केला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: दामन-राय येथे एडिसन सोरंग (वय २१ वर्षे) याच्या खून प्रकरणातील आरोपी प्रदीप डुंगडुंग आणि आनंद साशा या दोघांना आज दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांनी हा निवाडा दिला.

३० ऑगस्ट २०२० साली रात्री साडेदहाच्या सुमारास खुनाची घटना घडली होती. संशयितांनी एडिसन याच्यावर फावड्याने हल्ला करून त्याचा खून केला होता. एडिसन आणि दोन्ही आरोपी हे मूळ झारखंडमधील असून ते मजुरीचे काम करत होते. तसेच एकाच खोलीत राहात होते. मैत्रिणीच्या फोन नंबरवरून आनंदने एडिसनला चिडवण्यास सुरुवात केली.

त्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. गंभीर स्थितीत एडिसनला प्रथम दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गोमेकॉत हलविले असता, उपचार सुरू असताना ३१ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी संशयितांना अटक केली होती.

प्रदीप डुंगडुंग हा ३१ ऑगस्ट २०२० पासून कोठडीत असून त्याचा पाच वर्षे, दहा महिने आणि आठ दिवसांचा काळ, तर आनंद साशा हा १ सप्टेंबर २०२० पासून कोठडीत असून त्याचा पाच वर्षे, दहा महिने आणि सात दिवसांचा कोठडीतील आतापर्यंतचा काळ त्यांच्या अंतिम शिक्षेतून वजा केला जाईल.

प्रतिकाराचा प्रयत्न अयशस्वी

या झटापटीत स्वतःचा बचाव करण्यासाठी एडिसनने प्रदीपच्या छातीचा आणि हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. याचाच राग आल्याने आनंदने एडिसनच्या डोक्यावर फावड्याने जोरदार वार केला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. याकामी प्रदीपनेही त्याला मदत केली होती.

परिस्थितीजन्य पुराव्यांवरून शिक्षा

याप्रकरणी न्यायालयात एकूण २३ साक्षीदार तपासले. आरोपींनी बचावाचा कोणताही सबळ पुरावा सादर न केल्यामुळे न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोघांनाही समान हेतूने खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT