Goa : काणकोणात (Canacona) गेल्या आठवडाभर पडत असलेल्या अमोसमी पावसामुळे भातशेतीची (Paddy farming) मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्याचबरोबर मिरची पिकही धोक्यात आले आहे. गेला आठवडाभर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत.त्यामुळे तयार झालेले भाताचे पीक आडवे होऊन ते शेतजमिनीत रूतून बसले आहे.दोनचार दिवस पावसाची रिपरिप अशीच चालू राहिल्यास या आडव्या झालेले भाताचे दाण्याना अंकूर फुटण्याची प्रक्रिया सुरू होण्याची भिती आगोंद येथील एक शेतकरी सावियो फर्नांडीस यांनी सांगितले .
काणकोणात काही शेतजमिनीत उशीरा लागवड करण्यात येते त्यामुळे दरवर्षी परतीच्या पावसाचा या भात लागवडीला फटका बसत असतो.काही ठिकाणी गावच्या प्रमूख व्यक्तीने भात कापणीचा शुभारंभ केल्याशिवाय भातपिकाची कापणी न करण्याची परंपरा आहे.त्यामुळे काही भागात पिक तयार होऊनही भातपिकाची अद्याप कापणी झाली नसल्याने या भातशेतीलाही अमोसमी पावसाचा फटका बसला आहे.काही शेतकऱ्यांनी भाताची कापणी करून पिके सुकवण्यासाठी शेतातच ठेवली आहेत.तर काहीनी मळणी प्रक्रियेला सुरुवात केली होती मात्र या परतीच्या पावसाने त्यांचीही धांदल उडवून दिली आहे. गावडोंगरी खोतीगावात तुळशी विवाहानंतर भाताची मळणी घालण्याची परंपरा तोपर्यंत कापलेले भात शेतातच घुडवे रचून ठेवण्यात येते.
गेली अनेक वर्षे काणकोण मधील भातशेतीला परतीच्या पावसाचा फटका बसतो.त्यासाठी शेती लागवडीच्या वेळापत्रकात थोडासा बदल प्रायोगिक तत्त्वावर करून बघण्याची गरज विभागीय कृषी अधिकारी किर्तीराज नाईक गावकर यांनी व्यक्त केली.
मिरची शेतीलाही फटका.....
परतीच्या पावसाचा फटका मिरची शेतीलाही बसला आहे.काढणी झालेली मिरची ढगाळ वातावरण व पाऊस यावेमुळे सुकवायला मिळत नाही त्यामुळे काढणी झालेली मिरची कुजून जात आहे.गेल्या पावसामुळे मिरची पिकावर परिणाम होऊन मिरची पीक चाळीस टक्क्यांपर्यंत खाली आले होते त्यामुळे मिरचीचे दर प्रति किलो एक हजार रूपयापर्यत गेले होते.यंदाही अमौसमी पावसामुळे दर एक हजार रूपयांच्यावर जाऊन काणकोण (खोला) मिरची जास्त तिखट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.