Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: 4 दिवसांत पाऊस न पडल्‍यास धरणांची अवस्‍था 2023 सारखी! मान्‍सूनने पाठ फिरवल्‍याने जलसाठ्यात मोठी घट

Goa Dam Water Storage: मान्‍सूनचा पाऊस रखडल्‍यामुळे चार वर्षांनंतर यंदा जूनमध्‍ये राज्‍यातील धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झालेली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मान्‍सूनचा पाऊस रखडल्‍यामुळे चार वर्षांनंतर यंदा जूनमध्‍ये राज्‍यातील धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झालेली आहे. चापोलीतील पाणी २०२३ च्‍या तुलनेत कमी असून, पुढील चार दिवसांत मान्‍सूनच्‍या पावसाने हजेरी न लावल्‍यास इतर सर्वच धरणांतील पाणी टक्‍केवारीच्‍या दृष्‍टीने २०२३ ची बरोबरी करण्‍याची शक्‍यता आहे.

२०२३ मध्‍ये राज्‍यात मान्‍सूनचा पाऊस ११ जून रोजी दाखल झालेला होता. परंतु, त्‍यानंतर २२ जूनपर्यंत पावसाने पाठ फिरवलेली होती. त्‍यामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झालेली होती. २०२३ मधील २२ जूनच्‍या तुलनेत यंदा १८ जूनपर्यंत चापोली धरणातील पाणीसाठा सुमारे एक टक्‍क्‍याने कमी आहे.

तर, इतर धरणांची तुलना केल्‍यास पुढील चार दिवसांत पावसास सुरुवात न झाल्‍यास धरणांतील पाणीसाठा २०२३ मधील साठ्यापेक्षाही कमी होण्‍याची शक्‍यता असल्‍याचे जलस्रोत खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून स्‍पष्‍टपणे दिसून येते.

दरम्‍यान, २०२३ मध्‍ये जूनअखेरीस पावसाने हजेरी लावलेली होती. जुलैमध्‍ये मुसळधार पाऊस पडलेला होता. त्‍यानंतर ६ ते १७ ऑगस्‍ट या कालावधीत पावसाने पुन्‍हा विश्रांती घेतल्‍यानंतर परतीच्‍या काळात राज्‍याला झोडपले होते. त्‍यामुळे त्‍यावर्षी त्‍याने सरासरी गाठली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT