Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: गोवा डेअरीकडून दूध ग्राहकांना मोठा दिलासा; दरवाढ लांबणीवर!

Goa Dairy: गोवा डेअरी संचालक मंडळाकडून दूध दरवाढीसंबंधी पुढील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Dairy: गोवा डेअरीच्या बैठकीत दूध दरवाढीसंबंधी कोणताच निर्णय झाला नसल्याने अखेर दूध ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गोवा डेअरीत काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत इतर विषयांवर चर्चा झाली, मात्र दूध दरवाढीसंबंधी चर्चा झाली नाही. कदाचित पुढील बैठकीसाठी हा विषय राखून ठेवला असावा, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या बैठकीत गोवा डेअरीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे यांना बँक तसेच इतर व्यवहारासंबंधीचे अधिकार देण्यात आले. गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला इतर संचालक उपस्थित होते. यावेळी डेअरीच्या एकंदर कामकाजावरतीही चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीत गोवा डेअरीच्या म्हारवासडा - उसगाव येथील पशुखाद्य प्रकल्पासंबंधी प्रामुख्याने चर्चा झाली.

तसेच, या पशुखाद्य प्रकल्पात मागच्या काही दिवसांपूर्वी मोलेसिसच्या टाकीच्या व्हॉल्वचा स्फोट झाल्याने मळी वाहून जाण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारासंबंधी चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने अहवाल बैठकीसमोर ठेवला.

मात्र त्यासंबंधीचा पुढील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. बैठकीत निविदा व इतर विषयांवरही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात आले. गोवा डेअरीच्या उत्कर्षासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचेही यावेळी मान्य करण्यात आले.

नवे व्यवस्थापकीय संचालक!

मूळ महाराष्ट्रातील पण दूध उत्पादन व इतर विषयांवरील माहिती असलेले पशुवैद्यक योगेश राणे यांनी गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा गेल्या 5 डिसेंबरला ताबा घेतला, त्यामुळे योगेश राणे यांची संचालक मंडळासोबत ही पहिलीच बैठक होती.

या बैठकीत नवीन व्यवस्थापकीय संचालकाशी निगडित बँकिंग तसेच इतर आर्थिक व्यवहारासंबंधीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले, अशी माहिती गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT