Goa Dairy Milk Price Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy Milk Price: 'दूध खरेदी दरात वाढ करा, अन्यथा आंदोलन'! उत्पादकांचा इशारा; गोवा डेअरीला दिले निवेदन

Milk Procurement Price Goa Dairy: गोव्याच्या शेजारील राज्यांतील सहकारी व खासगी क्षेत्रातील दूध संघांनी साधारण एका महिन्यापूर्वी शेतकऱ्यांकडून दूध खरेदीसाठी भरीव दरवाढ जाहीर केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: शेतकऱ्यांकडून दूध खरेदी दरात अपेक्षित वाढ न केल्यास दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाचा पर्याय स्वीकारतील व त्यासाठी तयार राहा, अशी नोटीस दूध उत्पादकांच्या संघटनांनी गोवा डेअरीच्या व्यवस्थापनाला गुरुवारी दिली. गोवा डेअरीच्या सरकार नियुक्त व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी आंदोलनात उतरण्याची भूमिका स्पष्ट केली.

गोव्याच्या शेजारील राज्यांतील सहकारी व खासगी क्षेत्रातील दूध संघांनी साधारण एका महिन्यापूर्वी शेतकऱ्यांकडून दूध खरेदीसाठी भरीव दरवाढ जाहीर केली आहे. गोव्यातील दूध उत्पादक शेतकरी सुका व ओलाचारा तसेच सकस पशुआहारासाठी शेजारील राज्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.

अशा परिस्थितीत गोव्यातील दूध उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व खाद्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र गोव्यातील दोन्ही सहकारी दूध संघ, गोवा डेअरी आणि सुमूल सुस्त आहेत. साधारण पंधरा-वीस दिवसांआधी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केल्यानंतर दोन्ही दूध संघांनी केवळ एक रुपया प्रति लिटर अशी नाममात्र दरवाढ एक मार्चपासून लागू केली आहे.

या नगण्य दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठाच असंतोष पसरला आहे. गोवा राज्य दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकळयेंकर, भारतीय किसान संघाचे सुजय प्रभुदेसाई, गोवा डेरी संलग्न दूध संकलन सोसायटीचे अध्यक्ष नितीन प्रभूदेसाई, सुखठाणकर, लाला सतरकर व इतर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या शिष्टमंडळात भाग घेतला.

किरकोळ दरवाढ…

दूध उत्पादकांच्या संघटनांनी मागणी केलेल्या दरवाढीला कुठलेही महत्व न देता एक रुपयाची किरकोळ दरवाढ करणे हा दूध उत्पादकांचा घोर अपमान आहे, आणि दूध दरामध्ये शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे त्वरित वाढ करावी, असे दूध उत्पादकांच्या शिष्टमंडळाने सरकार नियुक्त व्यवस्थापकीय मंडळाचे अधिकारी व गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी वेगवेगळी चर्चा करताना स्पष्ट केले. तसेच गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय मंडळाला आंदोलनाची लेखी नोटीसही दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT