Goa Dairy Directors Corruption: गोवा डेअरीतील भ्रष्टाचार प्रकरणी अपात्र ठरवलेल्या 14 अपात्र संचालकांच्या निलंबनाबाबत बोलताना दूध उत्पादक आणि माजी चेअरमन दुर्गेश शिरोडकर यांनी केवळ निलंबन नको तर अपहाराची रक्कम वसुल करा, अशी मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, स्वतःच्या चेअरमनपदाच्या कार्यकाळातही अशाच पद्धतीची फसवणूक समोर आली होती. त्यावर त्यांनीच प्रकाश टाकलेा होता. 2020 मध्ये 1 कोटी 35 लाख रूपयांचा अपहार झाला होता.
पण त्यानंतर 3 वर्षे झाली तरी सरकार ती रक्कम वसुल करू शकलेली नाही. त्यामुळे केवळ निलंबन उपयोगाचे नाही तर रक्कम वसुल करणे गरजेचे आहे.
शिरोडकर म्हणाले की, निलंबन केले ही चांगली गोष्ट आहे, त्यांना नोटीस पाठवली ही देखील चांगली गोष्ट आहे. हे सगळं असलं तरी मुख्य मुद्दा आहे डेअरीचा जो काही तोटा झाला त्याची भरपाई कशी होणार? नोटीसा पाठवल्या त्या कुणाला वाचविण्यासाठई पाठवल्या आहेत का, हे देखील समोर आले पाहिजे.
सहा महिने झाले निलंबनाची कारवाई झाली. पण या सहा महिन्यात काहीही नोटीस पाठवली नाही. अविश्वास ठरावानंतर नोटीस पाठवल्या. त्यासोबतच त्यांच्याकडून वसुली झाली पाहिजे.
यापुर्वी कर्मचाऱ्यांची खोगीरभरती केल्याने 12 संचालक अपात्र ठरले होते. पण त्यातील 1 कोटी 35 लाखांची वसुली अद्याप झालेली नाही. तीन वर्षे होऊन गेली आहेत, पण वसुलीचा काहीही पत्ता नाही. त्यानंतर पुन्हा तेच लोक संचालक, चेअरमन झाले.
कुणाला तरी एकाला वाचविण्यासाठी संस्थेचे नुकसान कशाला करता. आज गोवा डेअरी तोट्यात आहे. वसुली झाली पाहिजे. स्टाफचा हात असेल तर त्यांच्याकडुनही वसुली केली गेली पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.