Goa Dairy AGM Adjourned Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy AGM Adjourned: मराठीत कामकाज नाकारल्याने गोवा डेअरीची सभा गुंडाळली! बेकायदेशीर नोटिशीवरूनही गदारोळ

Goa Dairy Illegal Notice Controversy: बेकायदेशीर नोटीस आणि मराठीतून कामकाज नाकारल्यामुळे गोवा डेअरीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुंडाळावी लागली.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: बेकायदेशीर नोटीस आणि मराठीतून कामकाज नाकारल्यामुळे गोवा डेअरीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुंडाळावी लागली. गोवा दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीची सर्वसाधारण सभा दूध उत्पादकांनी आक्षेप घेतल्याने तहकूब करण्यात आली.

कुर्टी येथील सहकार भवनात ही सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली. मात्र, गदारोळामुळे ही सभाच तहकूब केल्याने कोणतेच कामकाज झाले नाही. गोवा डेअरीच्या या सभेला राज्यभरातील दूध डेअरींचे प्रतिनिधी तसेच गोवा डेअरीच्या सरकारनियुक्त प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर, रामा परब आणि व्यवस्थापकीय संचालक नवीन कुमार उपस्थित होते. सभेच्या सुरवातीलाच सभेसंबंधी काढलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा दूध उत्पादकांनी केला.

यावेळी प्रचंड गोंधळ माजला. वास्तविक ही नोटीस सभासद निबंधकांनी काढायला हवी होती. मात्र, व्यवस्थापकीय संचालकांनी नोटीस पाठवल्याने ती बेकायदा असल्याचे सांगून सभा रद्द करावी तसेच पुन्हा नव्याने सभा घ्यावी, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली. दूध उत्पादकांच्या मागणीनुसार प्रशासकीय समितीने अखेर सभा रद्द केली. नवीन सभेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे डेअरी प्रशासकीय समितीने जाहीर केले.

इतिवृत्त मराठीत का नाही?'

सभेच्या सुरवातीला गोवा डेअरीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मराठीऐवजी इंग्रजीतून वाचून दाखवण्यास सुरवात केल्याने मराठीला का डावलले? डेअरीचे आतापर्यंतचे कामकाज मराठीतून झाले. मग आताच इंग्रजीतून का, असा सवाल दूध उत्पादकांनी करून आक्षेप घेतला. त्यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. अखेर बेकायदेशीर नोटीस आणि मराठीऐवजी इंग्रजीचा वापर या दोन मुद्यांवरून प्रशासकीय समितीने सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drowning Death: मोबोरच्या रिसॉर्टमध्ये दुर्दैवी घटना! किड्स पूलमधून मोठ्या पूलमध्ये गेल्याने 4 वर्षांच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! आठव्या वेतन आयोगानंतर पगार किती वाढू शकतो? निर्णयापूर्वी 'या' 5 गोष्टी समजून घ्या

वाडे-कुर्डीत दुर्दैवी घटना! पत्नीचा मृत्यू, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमके कारण अद्याप अस्पष्ट

FDA Raid: दिल्लीहून गोव्यात आलेले 1,470 किलो चिकन जप्त! अयोग्य तापमान अन् कागदपत्रांचा अभाव; 3.67 लाखांचा माल नष्ट

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार! 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

SCROLL FOR NEXT