Goa CZMP Dainik Gomantak
गोवा

Goa CZMP: 30 लाखांमुळे लटकला 'कुशावती'चा आराखडा; नव्या जिल्ह्याच्या समावेशासाठी अतिरिक्त निधीची मागणी

Goa CZMP 2019 Kushavati District: गोव्यासाठी तयार केलेल्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा २०१९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या कुशावती जिल्ह्याचा स्वतंत्र समावेश करण्यासाठी आणखी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यासाठी तयार केलेल्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा २०१९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या कुशावती जिल्ह्याचा स्वतंत्र समावेश करण्यासाठी आणखी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले आहे.

या कामासाठी ३० लाख रुपये अधिक जीएसटी अशी अतिरिक्त रक्कम देण्याची मागणी राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अभ्यास केंद्राने राज्य सरकारकडे केली आहे. मात्र, पर्यावरण व हवामान बदल विभागाने ही मागणी अवाजवी असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित करीत नव्याने खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

कुशावती जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी विद्यमान ‘सीझेडएमपी’मध्ये नव्या प्रशासकीय हद्दीचा समावेश करणे, तसेच कुशावतीशी संबंधित नकाशे आणि अहवाल स्वतंत्रपणे विभाजित करणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, संपूर्ण गोव्यासाठीचा ‘सीझेडएमपी’ तयार करण्याचे मुख्य काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे नव्या जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी संपूर्ण ‘सीझेडएमपी’ नव्याने तयार करण्याची आवश्यकता नसल्याचे विभागाचे मत आहे.

यामुळे केवळ प्रशासकीय सीमा बदलणे, संबंधित नकाशे आणि अहवालांचे विभाजन करणे यासाठी ३० लाख रुपये अधिक जीएसटीची मागणी योग्य आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विभागाने ‘एनसीईएसएस’ला प्रस्तावित ३० लाख रुपयांच्या खर्चाचा फेरआढावा घेऊन वाजवी आणि सुधारित खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

कुशावती जिल्ह्याच्या निर्मितीनंतर ‘सीझेडएमपी’मध्ये आवश्यक बदल करण्याची जबाबदारी कोणत्या पद्धतीने आणि किती खर्चात पार पाडली जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

अतिरिक्त रकमेचा पुनर्विचार करा

‘एनसीईएसएस’ने कुशावती जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी अतिरिक्त ३० लाख रुपये अधिक जीएसटी देण्याची मागणी केली होती. त्यावर पर्यावरण व हवामान बदल विभागाचे संचालक सचिन देसाई यांनी ‘एनसीईएसएस’च्या संचालकांना पत्र पाठविले आहे. या पत्रात कुशावतीचा समावेश करण्याच्या कामाचे स्वरूप आणि त्यासाठी मागितलेली अतिरिक्त रक्कम यांचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Gold Medal Final: IND vs PAK फायनलवर पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना मिळणार सुवर्णपदक? नियम काय सांगतो?

Goa Agriculture: शेती वाढवा, निर्यातीची दारे खुली! नारळ-काजू बागायतींच्या पुनरुज्जीवनासाठी शिवराजसिंह चौहानांची मोठी घोषणा

Horoscope: शनिवारी चमकणार 'या' 4 राशींचं नशीब! करिअरमध्ये मोठी संधी, व्यवसायात लाभ आणि कुटुंबात सुख-समृद्धीचे संकेत

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT