Fake Traffic Challan Scam Dainik Gomantak
गोवा

Fake Traffic Challan: 1,000 च्या वाहतूक चलनाच्या नावाखाली फसवणूक! एका क्लिकमुळे खात्यातून तब्बल 6.80 लाख गायब, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Fake Traffic Challan Scam Goa: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलचे एक हजारांचे वाहतूक चलन भरण्याच्या बहाण्याने अज्ञात सायबर ठगाने बाळ्ळी येथील एका इसमाला ६ लाख ८० हजार १५२ रुपयांना गंडा घातला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलचे एक हजारांचे वाहतूक चलन भरण्याच्या बहाण्याने अज्ञात सायबर ठगाने बाळ्ळी येथील एका इसमाला ६ लाख ८० हजार १५२ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहे.

अल्केश नाईक हे तक्रारदार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने तक्रारदाराशी व्हॉट्सपद्वारे संपर्क साधला. वाहतूक नियम उल्लंघनाचे एक हजारांचे चलन थकीत असल्याचे सांगून संशयिताने ते भरण्यासाठी अल्केश यांना मोबाईलवर एक एपीके फाईल लिंक पाठवली.

ती लिंक खरी असल्याचे समजून त्यांनी त्यावर क्लिक केले. लिंक ओपन होताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल आणि बँक खात्याचा ताबा मिळवला. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण ६,८०,१५२ .७३ रुपये काढून घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT