Assault Case Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 4 नाही 13 कोटींचा घोटाळा! गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरातपर्यंत पसरले जाळे; जालन्यातून एकाला अटक

Fake investment scam Goa: तपासादरम्यान, संशयित अविष्कार सुरडकर याच्या बँक खात्यात ८० लाख रुपये जमा झाले होते आणि तेथून ते अनेक स्तरांवरील खात्यांमध्ये वळवण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा सायबर क्राईम पोलिसांनी मोठ्या सायबर गुन्हेगारी प्रकरणाचा छडा लावत, बनावट गुंतवणूक योजनेद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य संशयित आविष्कार सुरडकर याला महाराष्ट्र-जालना येथून अटक केली आहे. या घोटाळ्याची एकूण व्याप्ती १३.१० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, अटकेमुळे अनेक राज्यांतील फसवणूक प्रकरणांचा गुंता सुटण्यास मदत होणार आहे.

पणजी येथील एका ज्येष्ठ नागरिकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने व्हॉट्सअॅप आणि यूट्यूबच्या माध्यमातून एका प्रतिष्ठित गुंतवणूक कंपनीचे (पीटीएम-क्यूआयबी) नाव वापरून बनावट ''आयपीओ'' स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवले होते.

या आमिषाला बळी पडून तक्रारदाराला तब्बल ४.७४ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. तपासादरम्यान, संशयित अविष्कार सुरडकर याच्या बँक खात्यात ८० लाख रुपये जमा झाले होते आणि तेथून ते अनेक स्तरांवरील खात्यांमध्ये वळवण्यात आले. यापूर्वीच्या तपासामध्ये बंगळूरु येथील आणखी एका संशयिताच्या खात्यात ३० लाख रुपये प्राप्त झाले होते.

प्राथमिक तपासात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये या फसवणूक गटाचे जाळे पसरलेले असून, एकूण फसवणुकीची एकत्रित रक्कम १३.१० कोटी रुपये असल्याचे उघड झाले आहे.

पोलिस कोठडी!

पोलिस अधीक्षक (सायबर क्राईम) राहुल गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. व्ही. श्रीवास्तव आणि पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेर्वीन डी''कोस्टा, हेड कॉन्स्टेबल विराज नार्वेकर आणि कॉन्स्टेबल विरेंद्र वाडकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयात हजर केले असून, पुढील तपासासाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT