Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: चेअरमेन असल्याचे भासवून 19 वर्षीय युवकाने कंपनीच्या अधिकाऱ्यालाच घातला 93.21 लाखांचा गंडा

Goa Cyber Crime Arrest: हा प्रकार ३ ते ५ डिसेंबरच्या कालावधीत घडला असून गोव्यातील सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे

Akshata Chhatre

गोव्यातील एका खासगी कंपनीचे चेअरमेन असल्याचे भासवून हरियाणातील एका १९ वर्षीय युवकाने ९३.२१ लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार ३ ते ५ डिसेंबरच्या कालावधीत घडला असून गोव्यातील सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

नहीम खान (वय, १९ हरियाणा) याने गोव्यातील खासगी कंपनीत चेअरमेन असल्याचे भासवून त्याने त्याच कंपनीच्या सरव्यवस्थापकाशी व्हाट्सअपवरून संवाद साधला. बैठकीचे निमित्त साधून त्याने सरव्यवस्थापकाला विविध बँक खात्यांमधून तब्बल ९३ लाख २१ हजार ४१४ रुपये पाठवायला सांगून गंडा घातला.

संबंधित माणसाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या फसव्या तरुणाचा शोध सुरु झाला आणि पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने हरियाणा येथे लपून बसलेल्या नहीम खानचा शोध घेत त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. या संपूर्ण प्रकरणाचा सायबर गुन्हे तपास पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, सहाय्यक अधीक्षक अक्षत आयुष,पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी केला.

वयाने केवळ १९ वर्षांचा असला तरीही नहीम खान मोठा ठग आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांना नहीम खानची तीन बँक खाती सापडली, ज्यात क्रमशः ३३ लाख, ३१ लाख आणि ७. ५७ लाख रुपये सापडले आहेत. पोलिसांनी ही तिन्ही खाती गोठवली आहे. सध्या देशात विविध ठिकाणी फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. ओळखीच्या लोकांचे प्रोफाईल फोटो वापरून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे अशा कुठल्याही फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT