Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime In Goa: साडेचार वर्षांत तब्बल 159 सायबर गुन्हे; कोट्यवधींचा गंडा

कोट्यवधींना गंडा : संशयितांना गजाआड करण्यात तांत्रिक अडचणी

गोमन्तक डिजिटल टीम

Cyber Crime In Goa ऑनलाईन व्यवहारामुळे गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हे वाढू लागले आहेत. अनेकजण डिजिटल ऑनलाईन व्यवहाराला बळी पडले असून ती प्रकरणे सायबर क्राईममध्ये नोंद झाली आहेत. गेल्या साडेचार वर्षांत सायबर क्राईम विभागात अशा 159 प्रकरणांची नोंद झाली असून कोट्यवधींचा गंडा पडला आहे.

या व्यवहारात गुंतलेले संशयित हे बनावट मोबाईल क्रमांक तसेच बँकेची खाती देत असल्याने व त्यांचा शोध घेणे मुष्किलीचे होत असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नावर दिली आहे.

गृह खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये १४ सायबर क्राईमची प्रकरणे नोंद झाली आहेत तर २०२० मध्ये ही संख्या ३२ वर गेली. २०२१ मध्ये या प्रकरणांची संख्या किंचित कमी होऊन ती २७ वर आली. मात्र, अचानक २०२२ मध्ये ही संख्या ६५ वर पोहचली. यावर्षी जून २०२३ पर्यंत २१ प्रकरणे नोंद झाली आहे.

सायबर क्राईम विभागात अत्याधुनिक यंत्रणा आहेत. मात्र, काहींचे स्रोत हे देशाबाहेर असल्याने त्याची माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. किमती भेटवस्तूंचे आमिष दाखवून लाखो रुपये बँक खात्यावर पाठवण्यास सांगितले जाते.

अशी दक्षता घ्या!

1 बऱ्याचदा व्हॉट्स ॲप किंवा ईमेलवर मेसेज येतात, त्याबाबत सतर्क राहणे हाच उपाय आहे.

2 मोबाईलवर आलेले मेसेज उघडण्यापूर्वी त्याची खात्री करा.

3 अनेकदा असे मेसेज उघडल्यावर तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती संशयितांना कळते व तुमच्या खात्यावरील पैसे गायब झाल्याचे समजेपर्यंत उशीर झालेला असतो.

4 मोबाईलवरून एटीएम कार्ड क्रमांक, ओटीपी क्रमांक किंवा ‘पिन’ क्रमांक विचारला तर सांगू नये.

5 बँकेतील अधिकारी केव्हाच मोबाईलवरून बँक खात्याची माहिती विचारत नाहीत.

मागे पुरावा नाहीच!

बहुतांश प्रकरणे ही वित्तीय फसवणुकीची आहेत. गेल्या साडेचार वर्षांमध्ये २०१९ साली ७ प्रकरणे नोंद झाली. त्यामध्ये अधिक व्याज देण्याच्या आमिषाला काही व्यक्ती बळी पडल्या. २०२० मध्ये २५ प्रकरणे, २०२१ मध्ये २३, २०२२ मध्ये ४३ तर यावर्षी जून २०२३ पर्यंत १७ प्रकरणांची नोंद झाली आहे.

हे संशयित आयटी क्षेत्रातील अनुभव असलेले असतात. कोठेही पकडले जाऊ नये यासाठी ते पूर्ण खबरदारी घेऊन अनेकदा वेगवेगळ्या बँक अकाऊंटवरून किंवा मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधतात.

एकदा व्यवहार झाला की त्याचा काहीच नामोनिशान ठेवत नाहीत. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीने तक्रार दिली तरी ती माहिती मिळवण्यासाठी यश येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Money Laundering Case: 'अल फलाह युनिव्हर्सिटी'च्या संस्थापकाला ठोकल्या बेड्या, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; लाखोंच्या कॅशसह दस्तऐवज जप्त

IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा धक्का, शुभमन गिलनंतर आणखी 3 खेळाडू रुग्णालयात दाखल; कारण काय?

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

SCROLL FOR NEXT