Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: सांगेत बारावी परीक्षा केंद्र सुरु करण्याची मागणी

Goa Education: विद्यार्थ्यांचे कुडचडे येथील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी हाल होत असल्याने ही मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Education: कुडचडे येथील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूपच त्रासदायक होणार असल्याने बारावी परीक्षा केंद्र सांगेतच करण्याची मागणी सांगे हायर सेकंडरीच्या पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्ष रजनी गावकर यांनी केली आहे.

सांगे हायर सेकंडरीत नेत्रावळी, वाडे-कुर्डी, विलीयण, भाटी, वालकीणी, मळकर्णे, काले अशा अनेक ग्रामीण भागांतून विद्यार्थी येतात. नेत्रावळी ते कुडचडे हे ३७ कि.मी. अंतर असून परीक्षा केंद्रात वेळेत पोहोचण्यासाठी सकाळपासून धावाधाव करावी लागणार आहे.

इतका लांबचा प्रवास करून परीक्षा देणे हे सर्वच विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने शक्य होत नसते. याचा विचार करून शिक्षण मंडळाने सांगेतील बारावीमधील विद्यार्थ्यांना सांगेतच परीक्षा केंद्र करणे आवश्यक आहे. सांगेतील सुमारे दीडशे विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.

कोरोना काळात शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी सांगे केंद्राचे तीन विभाग करून सांगे, वाडे-कुर्डी आणि नेत्रावळी अशा ठिकाणी परीक्षा केंद्र तयार करून सुविधा निर्माण केली होती. त्याच पद्धतीने सांगेतच बारावी परीक्षा केंद्र सुरू करण्याची आवश्यकता पालक वर्ग व्यक्त करीत आहे.

मंत्री फळदेसाई यांनी लक्ष घालावे

दीडशे विद्यार्थी बारावी परीक्षा देणार असल्याने आणि त्यांच्यासाठी हा लांबचा प्रवास असल्याने सांगेतच बारावी परीक्षा केंद्र करण्यासाठी सांगेचे आमदार तथा समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी लक्ष घालण्याची मागणी पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्ष रजनी गावकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT