Cuncolim Industrial Estate Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Industrial Estate: कुंकळ्‍ळीत कॅन्सर, टीबी रुग्ण संख्येत वाढ; 'शहराची वाटचाल विनाशाकडे'- ग्रामस्थांचा आर्त टाहो

औद्योगिक वसाहत तापदायक : प्रदूषणामुळे लोक आजारांनी ग्रस्‍त

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim Industrial Estate ‘बाप भीक मागायला देत नाही आणि आई जेवण देत नाही’ अशीच काहीशी स्थिती कुंकळ्‍ळीकरांची झालेली आहे. औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणामुळे जनता तीळ-तीळ मरत आहे.

मात्र या प्रदूषणास लगाम घालण्याचे सामर्थ्य कुणीच दाखवत नाहीय. विधानसभेत प्रदूषण व औद्योगिक वसाहतीतील गैरकारभाराचा प्रश्न येतो, चर्चा होते.

यावर मंत्री एक तर आपली हतबलता जाहीर करतात किंवा आश्वासन देतात, आणि विरोधक रस्त्यावर येण्याचे केवळ इशारे देतात. प्रत्यक्षात काही होत नाही. ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’.

कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत क्षेत्रफळ, व्याप्ती व उद्योगात राज्‍यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु प्रदूषणात या औद्योगिक वसाहतीचा गोव्यातच नव्हे तर देशात वरचा क्रमांक आहे. जगाने नाकारलेले उद्योग या औद्योगिक वसाहतीत आहेत.

काँग्रेस पक्षाची सत्ता असताना कुंकळ्‍ळीत प्रदूषणाचा पाया रोवला तर भाजपने त्‍यावर कळस चढविला. नोकरी नसल्याने आम्ही उपाशीपोटी झोपू, पण कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण रोखा.

कारण या स्लो-पॉयझनमुळे आम्‍ही हळूहळू मरणाच्‍या दारात जात आहोत, असा टाहो कुंकळ्‍ळीकर गेल्या अनेक वर्षांपासून फोडत आहेत.

परंतु डोळ्यावर पैशांचे कातडे ओढलेले व डोक्यात सत्तेचा माज असलेले राजकीय नेते, सरकार व जनतेच्या पैशातून ज्यांना वेतन मिळते ते सरकारी अधिकारी कुंकळ्‍ळीचा विनाश उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.

त्याहून दुःखद गोष्ट म्हणजे ज्या कुंकळ्‍ळीच्या शूरवीरांनी आपल्या मायभूमीसाठी त्याग केला व प्राणांची आहुती दिली त्यांचे वारसही गप्‍प आहेत. दिवस सरत आहेत, तसतशी कुंकळ्‍ळी विनाशाकडे जात आहे.

शापित व प्रदूषित औद्योगिक वसाहतीमुळे कुंकळ्‍ळीत कॅन्सर, टीबी, फुफ्‍फुसांचे विकार, दमा व अन्‍य आजार वाढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या भागातील लोक घातक आजारांना बळी पडत आहेत आणि याला एकमेव कारण म्हणजे प्रदूषण होय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT