Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture : सांगेच्या पाईकदेवाला पोलिसांची सलामी; महालात पालखी मिरवणूक

त्रैवार्षिक पालखी उत्सव; सुवासिनींकडून ओवाळणी

दैनिक गोमन्तक

सांगे महालाचे आराध्य दैवत श्री पाईक देवाचा त्रैवार्षिक पालखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सात वाजता तेमचीवाडा-कोटार्ली येथून बॅण्डवादनासह निघालेली महाराजांची स्वारी सांगे महाल फिरून रात्री नऊ वाजता परत मंदिरात दाखल झाली. यावेळी ठिकठिकाणी सुवासिनींनी आरती ओवाळली. तसेच बंदूकधारी पोलिसांनी सलामी दिली.

शेकडो भाविक ठिकठिकाणी महाराजांच्या पालखीची प्रतीक्षा करीत होते. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी तर काही भाविकांनी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाचा आशीर्वाद घेतला. संपूर्ण सांगे महाल आज भक्तिभावाने न्हाऊन गेला होता. महाराजांची स्वारी सांगे पोलिस स्थानकाजवळ पोहोचताच बंदूकधारी पोलिसांनी महाराजांना सलामी दिली. हा अनोखा क्षण पाहण्यासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती.

यावेळी सांगेचे पोलिस निरीक्षक प्रवीण गावस उपस्थित होते. या पालखी मिरवणुकीत समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई सहभागी झाले होते. पालखी उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाल्यामुळे नेहमीपेक्षा दीड तास उशीर झाला. या पालखी उत्सवात शेकडो अबालवृद्ध भक्तिभावाने सहभागी झाले होते. संपूर्ण सांगे महाल तोरणे, पताकांनी सजविला होता. रांगोळीने रस्ते रंगून गेले होते. रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT