Goa Culture Minister Govind Gaude  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: काय तो सोक्ष मोक्ष लागणार! कला अकादमीप्रश्‍नी मंत्री गावडेंचे चौकशीचे आदेश; प्रकाश व्यवस्थेतील बिघाडाचा तपास सुरु

Minister Govind Gaude responds to Kala Academy technical problem: कला अकादमीच्या सभागृहात रविवारी सायंकाळी ‘पुरुष’ या मराठी नाटकाच्या सादरीकरणावेळी तांत्रिक बिघाड झाला. प्रसारमाध्यमांमुळे हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोचल्याने कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपशीलवार चौकशीचे आदेश दिले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कला अकादमीच्या सभागृहात रविवारी सायंकाळी ‘पुरुष’ या मराठी नाटकाच्या सादरीकरणावेळी तांत्रिक बिघाड झाला. प्रसारमाध्यमांमुळे हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोचल्याने कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपशीलवार चौकशीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत याप्रश्‍नी अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

नाटकाच्या सादरीकरणावेळी प्रकाश योजनेत ‘फ्लिकर’ आल्याने ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना रसिकांची माफी मागावी लागली होती आणि हे नाटक काही काळ थांबवावे लागत असल्याचे जाहीर करावे लागले होते. या प्रकरणाची दखल स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी घेतली. त्यामुळे कला अकादमीच्या व्यवस्थापनाची लक्तरे वेशीवर टांगल्याची टीका विरोधकांसह कलाकारांनी केली. या प्रकाराला ‘साबांखा’ जबाबदार मंत्री गावडे यांनी कला अकादमीच्या (Kala Academy) सदस्य सचिवांकडून तपशीलवार अहवाल मागितला आहे.

गावडे यांनी सांगितले की, नाटकाच्या सादरीकरणात तांत्रिक अडचणी येणे, ही दुर्दैवी बाब आहे. ही बाब नाट्यकला आणि प्रेक्षक दोघांच्याही दृष्टीने निराशाजनक आहे. सदस्य सचिवांना दोन दिवसांच्या आत संपूर्ण तपशीलासह अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच याची पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT