Sanguem Crime News Goa Police dead body near SMC building Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सांगे पालिकेच्या इमारतीजवळ आढळला कामगाराचा मृतदेह, जवळच सापडल्या दारुच्या बाटल्या; परिसरात खळबळ

Sanguem Crime News: पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Pramod Yadav

Goa Crime News:सांगे पालिका इमारतीच्या जवळच परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. पालिकेच्या जवळ असणाऱ्या एका मोकळ्या खोलीत हा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगे पालिकेच्या जवळील एका मोकळ्या खोलीत उत्तर प्रदेश येथील कामगाराचा मृतदेह आढळून आला. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, सांगे पालिका इमारतीच्या जवळच एक चाळ आहे. त्या चाळीत असणाऱ्या एका मोकळ्या खोलीत या कामगाराचा मृतदेह आढळून आला आहे. या परिसरात अनेक विविध शॉप आहेत आणि याठिकाणी दारुच्या बाटल्या आणि चिप्सचे पॅकेट्स देखील आढळून आले आहेत. अशापद्धतीने उघड्यावर होणाऱ्या मद्यपानाबाबत स्थानिकांनी सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, कामागाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे का त्याचा खून करण्यात आला आहे? याबाबत माहिती समोर आलेली नाही. तसेच, मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी नेमके काय घडले? याबाबत पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT