Mental Health | Astro Tips for Mental Stress Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

Tisk Usgao Crime News: तिस्क-उसगाव येथे बुधवारी (ता.१३) राहत्या घरात पिता बळीराम चंदगडकर आणि पुत्र प्रमोद चंदगडकर याचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: प्रमोद चंदगडकर याची गेल्या महिन्याभरापासून मन:स्थिती ठीक नव्हती. त्यातच तो वडिलांवर संतापून ओरडायचा. त्यातूनच त्याने वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला व स्वतः गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती गुरुवारी (14 नोव्हेंबर) बळीराम चंदगडकर यांची विवाहित कन्या पार्वती देसाई हिने फोंडा पोलिसांना दिली.

तिस्क-उसगाव येथे बुधवारी (ता.१३) राहत्या घरात पिता बळीराम चंदगडकर आणि पुत्र प्रमोद चंदगडकर याचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. बळीराम यांच्या मानेवर तसेच इतर ठिकाणी कोयत्‍याने वार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता तर प्रमोदने गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणाचा गुंता नेमका काय आहे. फोंडा पोलिस याचा तपास करत आहेत, तरीही प्रत्यक्षदर्शी कोणताच पुरावा नसल्याने या दोघांच्या मृत्यूचे गूढ कायम राहिले आहे.

फोंडा पोलिसांनी बळीराम चंदगडकर तसेच प्रमोद चंदगडकर यांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली असता बळीराम यांच्या मानेवर खोल वार केल्याने त्यांचा गळा चिरला गेला त्यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. बळीराम यांचा व्हिसेरा जपून ठेवण्यात आला आहे. दोन्ही मृतदेह फोंडा पोलिसांनी अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. फोंडा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

बळीराम करायचे मोलमजुरी

पार्वती शंकर देसाईच्या नवऱ्याचाही खून झाला होता. ती जोयडा-कारवार येथील रहिवासी होती; पण सध्या ती तिस्क-उसगाव येथेच राहते. याशिवाय प्रमोदचा भाऊही असाच अचानक वारला होता. गेली अनेक वर्षे बळीराम तिस्क-उसगाव येथे मजुराचे काम करीत होते आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते; पण प्रमोदची मनस्थिती या दिवसांत ठीक नसल्याने त्याने आपल्या वडिलांवर कोयत्याने वार केल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा बळीराम यांची कन्या पार्वती देसाई हिने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT