Margao District Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अखेर 13 महिन्यांच्या चिमुकलीला मिळाला न्याय; नराधमाला कोर्टाने ठोठावली 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Child Sexual Abuse Case: राज्यात मागील काही दिवसांत लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातच, लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत बाल न्यायालयाचा एक महत्वाचा निर्णय आला आहे.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांत लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातच, लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत बाल न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय आला. फोंडा परिसरात 2015 मध्ये 13 महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करुन अत्याचार करण्यात आला होता. न्यायालयाने 28 वर्षीय तरुणाला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि साडेनऊ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. बाल न्यायालयाचे अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी आदेश दिला.

पोलिस तपास

दरम्यान, तत्कालीन पोलिस निरिक्षक सुदेश नाईक यांनी या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केला होता. नाईक सध्या पणजीचे पोलिस उपअधिक्षक आहेत. पीडितेच्या वडिलांनी फोंडा पोलिस ठाण्यात 31 मे 2015 मध्ये तक्रार दाखल केली होती. 30 मे 2015 रोजी 1.30 ते 2.30 दरम्यान शेजारी राहणाऱ्या आरोपीने 13 महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण केले होते. नराधमाने वाहनात नेऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता.

गुन्हा दाखल करुन अटक

फोंडा पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत तत्कालीन पोलिस निरिक्षक सुदेश नाईक यांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमे, गोवा बाल कायदा आमि बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्यातर्गंत गुन्हा दाखल करुन अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी 25 जानेवारी 2016 रोजी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील अॅना मेडोंका आणि थेमा नार्वेकर यांनी युक्तिवाद मांडून आरोपीविरोधातील पुरावे सिद्ध केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT