Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! माय-लेकाला नदीत ढकलून त्यांनी स्‍वत: घेतला गळफास, 'या' कारणास्तव उचलले शेवटचे पाऊल

सर्वत्र खळबळ : व्यावसायिकाची पत्‍नी व मुलासह आत्‍महत्‍या

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime स्वत:ची कंपनी सुरू करण्यासाठी बँका व खासगीतून घेतलेल्या कर्जाचा बोजा वाढल्याने व कर्जाच्या रकमेची परतफेड करता येत नसल्याने मूळ कारवार पण माटवे-दाबोळी येथे वास्तव्य करून असलेल्या एका जोडप्याने आपल्या मुलासह आत्महत्येचा मार्ग पत्करला.

पती श्याम दुवा पाटील (50), पत्नी ज्योती पाटील (37) व मुलगा दक्ष पाटील (12) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्देवी घटना काल बुधवारी कारवार व पाडी-कुंकळ्ळी येथे घडल्या. आज गुरुवारी त्‍या उघडकीस आल्‍या. या घटनेने राज्‍यात खळबळ माजली आहे.

श्याम पाटील व ज्योती पाटील हे दाम्‍पत्‍य आपल्‍या मुलासह काल बुधवारी दुपारी ३ वाजल्यानंतर कारवारहून गोव्याच्या दिशेने यायला निघाले. वाटेत श्‍‍याम याने कारवारच्या पुलावर आपली गाडी उभी केली.

त्‍याच्‍या डोक्‍यात अगोदरपासूनच आत्‍महत्‍येचे विचार घोळत होते. त्‍याने आपल्‍या पत्‍नीला आणि मुलाला गाडीबाहेर बोलावले आणि संधी साधून त्‍यांनी पत्नी ज्योती व मुलगा दक्ष या दोघांना पुलावरून खाली काळी नदीत ढकलून दिले.

त्‍यानंतर श्‍‍यामने स्वत: नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला असता तेथून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड केली. त्‍यामुळे श्‍‍यामने तातडीने गाडी बसून गोव्याच्या दिशेने पळ काढला.

त्यानंतर पाडी-कुंकळ्ळी येथे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून जंगलात निर्जन्यस्थळी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून श्‍‍यामने आपले जीवन संपवले. त्यांचा पुतण्या विराज नाईक यांनी मृतदेहाची ओळख पटविली आहे.

आत्‍महत्‍येपूर्वी श्‍‍यामने आपला मेहुणा सचिन नाईक आणि एक जवळचा मित्र राजकुमार गोणी यांना मेसेज करून आत्महत्या करत असल्याचे कळविले होते.

उत्तरीय तपासणीसाठी श्‍‍यामचा मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठविल्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितले. तर, ज्योती पाटील व दक्ष पाटील यांचे मृतदेह देवबाग येथे पोलिसांना सापडले. या प्रकरणी चित्ताकूल-कारवार पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT