Goa Crime: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: रशियन कैद्याचा न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न; ड्रग्ज प्रकरणात झाली होती अटक

पोलिसांनी पाठलाग करून पकडले; गुन्हा दाखल

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Crime: ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका रशियन नागरीकाने आज, गुरूवारी म्हापसाती अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, एक्सॉर्ट पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.

त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी ही माहिती दिली.

आज, गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. मकसिन कुसानी असे या कैद्याचे नाव आहे. ड्रग्ज प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलने त्याला अटक केली होती. त्याला सुनावणीसाठी न्यायालयात आणले जात असताना त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

तथापि, तो 100 मीटर अंतरापर्यंत पळून गेलेला असतानाच एस्कॉर्ट पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. या प्रकरणी त्याच्यावर म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर मकसिन कुसानी याची कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ट्रान्सफर वॉरंटद्वारे म्हापसा पोलिस त्याचा ताबा घेतील. सध्या पोलिस निरीक्षक शितकांत नायक यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

SCROLL FOR NEXT