Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पणजीतील कॉर्तीन परिसरात ड्रग्सप्रकरणाचा पर्दाफाश!! 15 लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक

Goa Drug Case: गोवा पोलिसांनी पणजी येथील कॉर्तीन परिसरातील पदपुलाजवळ सोमवारी (३ मार्च) मोठी कारवाई करत १५ किलो गांजा जप्त केला आहे.

Sameer Amunekar

पणजी : गोवा पोलिसांनी पणजी येथील कॉर्तीन परिसरातील पदपुलाजवळ सोमवारी (३ मार्च) मोठी कारवाई करत १५ किलो गांजा जप्त केला आहे. या अंमली पदार्थांची बाजारातील किंमत अंदाजे १५ लाख असल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी ओडिशामधील देवदत्ता नायक आणि वेर्ण्यातील बेंझिल कदम या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत, हे दोघेही मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलिसांकडून या तस्करीच्या मागे आणखी कुणाचा हात आहे का? याचीही चौकशी सुरू करण्यात आलीय .

गोवा पोलिसांनी राज्यातील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गोव्यात अनेक ठिकाणी गस्त वाढवण्यात आली असून, संशयित हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.

गोवा हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण असल्यानं, अंमली पदार्थ विक्रेत्यांचं नेटवर्क सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. मात्र, पोलिसांनी अशा तस्करांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT