Trio of thieves in bicholim Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : डिचोली शहरात भुरट्या चोऱ्या करणारे 'त्रिकूट'

दोन महिलांचा समावेश, सीसीटिव्ही 'फुटेज'मधून उघड

दैनिक गोमन्तक

डिचोली : भंगार वस्तू गोळा करण्याच्या नावाखाली भुरट्या चोऱ्या करणारे एक 'त्रिकूट' पहाटे-पहाटेच डिचोली शहरात फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. एका आस्थापनातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या 'फूटेज'वरून हा प्रकार उघड झाला आहे.

(Trio of thieves in bicholim)

या त्रिकूटामध्ये दोन महिलांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले. या त्रिकूटाकडून आतापर्यंत मोठा हात मारला आहे की नाही, ते समजू शकले नाही. मात्र हा प्रकार पाहता डिचोलीवासियांनी वेळीच सावध राहण्याची गरज आहे.

सीसीटिव्ही फूटेज

पॅकिंगसाठी ठेवलेले बॉक्स गायब होतात म्हणून शहरातील एका आस्थापनाच्या मालकाने मंगळवारी (ता. 2) सकाळी सीसीटिव्ही फुटेज तपासली असता, बॉक्स चोरीस जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मंगळवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास तीनचाकी सामानवाहू सायकलवरून उतरल्यानंतर दोन महिला आस्थापनाच्या आवारात शिरतात. तर सायकलस्वार निघून जातो. थोड्या वेळाने हातात बॉक्स घेऊन त्या महिला निघून जातात. असे दृष्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पहाटे हा प्रकार घडल्याने भंगार वस्तू गोळा करण्याच्या निमित्ताने चोरीच्या उद्धेशानेच हे त्रिकूट फिरत असल्याचा संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT