Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अट्टल गुन्हेगार मारियासह दोघेजण गजाआड! पर्वरी पोलिसांची धडक कारवाई; संशयितांना 6 दिवसांची कोठडी

Porvorim Police Action Maria Baptista: राज्यातील विविध भागात दोन डझनपेक्षा अधिक घरफोड्या व चोऱ्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल गुन्हेगार मारिया सांतान बाप्तिसा (५४,बाणावली) याच्यासह दोघांना पर्वरी पोलिसांनी शिताफीने अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim News: राज्यातील विविध भागात दोन डझनपेक्षा अधिक घरफोड्या व चोऱ्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल गुन्हेगार मारिया सांतान बाप्तिसा (५४,बाणावली) याच्यासह दोघांना पर्वरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. संशयितांना न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

चोरलेले दागिने व इतर किंमती वस्तू गोव्यातील काहींना विकल्याची माहिती दिली आहे. काहींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे मारिया बाप्तिसा व महम्मद सुफियान (२०, नावेली) अशी आहेत. सुफियान हा वाणिज्य शाखेचा प्रथमवर्ष विद्यार्थी आहे. मारिया याला यापूर्वी कोलवा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे नोंद आहेत तर काही प्रकरणांमध्ये न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

यावर्षी मे ते सप्टेंबर याकाळात घरफोड्या व चोऱ्या करून संघटित टोळीने पोलिसांची झोप उडवली होती. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर गोव्यातील पणजी, पर्वरी, म्हापसा व हणजूण पोलिस स्थानकाने तपास पथके तयार करून या चोरट्यांचा शोध घेत होते.

या तपासात अटकेतील गुन्हेगारांची माहिती मिळवल्यानंतर मारियाबाबत संशय वाढला. त्याला पर्वरी पोलिसांनी बाणावलीतून ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत नागाळी, बांबोळी, म्हापसा व शिवोलीतील घरफोड्यांमधील समावेश उघड झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT