Bicholim Police Arrestst a youth  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: डिचोलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पर्येतील युवकाला अटक

पीडीत मुलीच्या आईने दाखल केली तक्रार

Akshay Nirmale

Goa Rape on Minor: गोव्यातील डिचोली येथे एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे. संबंधित मुलीच्या मित्रानेच हे कृत्य केले असून स्वप्निल माशेलकर (वय २२ वर्षे) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

तो पर्येचा रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक तपास केला जात आहे.

याबाबत डिचोली पोलिसांत पीडीत मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, पर्येतील स्वप्निल गुरूदास माशेलकर या तरूणाने माझ्या अल्पवयीन मुलीसोबत विविध ठिकाणी वारंवार शरीरसंबंध ठेवले.

तसेच मुलीचा मोबाईल फोनही फोडला. तो म्हालशेकरवाडा पर्ये येथील रहिवासी आहे. या तक्रारीवरून डिचोली पोलिसांनी तत्काळ स्वप्निल माशेलकर याला अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे.

दरम्यान, स्वप्निल हा पीडीत मुलीचा मित्र असल्याचे कळते. पीडीत मुलगी 17 वर्षांची आहे. स्वप्निलने तिला फूस लावून तिच्या मनाविरूद्ध तिच्याशी शारीरीक संबंध ठेवल्याचे कळते.

मुलीच्या आईला याबाबत माहिती कळाल्यावर त्यांनी लागलीच डिचोली पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर हे या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT