Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: 'ती' अवघ्या 15 वर्षांची! बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आलं भयानक सत्य, उत्तर प्रदेशच्या तरूणाला बेड्या

up man arrested in bicholim: डिचोलीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

डिचोली: डिचोलीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर, या प्रकरणातील गुढ उकलले असून, पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी एका आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. जेव्हा तिने बाळाला जन्म दिला, तेव्हा या घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेने पोलिसांना सूचित केले. अल्पवयीन मुलीचे बाळंतपण झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुरुवातीला सर्वच स्तरातून आश्चर्याची भावना व्यक्त केली जात होती, मात्र तपासाची चक्रे वेगाने फिरल्यानंतर एका नराधमाचा चेहरा समोर आला.

उत्तर प्रदेशातील तरुणावर गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत मीर शाह (वय २०, मूळचा उत्तर प्रदेश) या तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. डिचोली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आणि संबंधित कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समाजातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.

पुढील तपास सुरू

सध्या पीडित मुलीची आणि नवजात बालकाची प्रकृती कशी आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. आरोपीने मुलीला कशा प्रकारे जाळ्यात ओढले, किती दिवसांपासून हा अत्याचार सुरू होता आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT